धक्कादायक ! Quarantine व्हावं लागेल म्हणून वडिलांचा मृतदेह कापूर-अगरबत्ती लावून घरातच ठेवला
विरारच्या गोकुळ टाऊनशीप येथील ब्रोकलीन सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याच्या भीतीने घरातील सदस्यांनी हा मृतदेह धुप, कापूर आणि अगरबत्ती लावून ४ दिवस घरातच ठेवला. आपल्याला क्वारंटाइन व्हावं लागेल या भीतीमधून या कुटुंबाने हे कृत्य केल्याचं कळतंय. वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुलींनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही धक्कादायक बाब […]
ADVERTISEMENT
विरारच्या गोकुळ टाऊनशीप येथील ब्रोकलीन सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याच्या भीतीने घरातील सदस्यांनी हा मृतदेह धुप, कापूर आणि अगरबत्ती लावून ४ दिवस घरातच ठेवला. आपल्याला क्वारंटाइन व्हावं लागेल या भीतीमधून या कुटुंबाने हे कृत्य केल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
वडिलांच्या मृत्यूनंतर दोन मुलींनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यापैकी एका मुलीला वाचवण्यात पोलिसांना यश आलं असून एका बहिणीचा मृत्यू झालाय.
विरार पश्चिमेकडील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या हरिदास सहरकर यांचा १ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. सहरकर यांना दोन अविवाहीत मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आपल्या वडिलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे या भीतीपोटी आपल्यालाही क्वारंटाईन व्हावं लागेल म्हणून या कुटुंबाने मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता घरातच ठेवून दिला. कोणाला संशय येऊ नये म्हणून घरच्यांनी धूप, अगरबत्ती आणि कापूरही लावून ठेवला.
हे वाचलं का?
यादरम्यान घरातील परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्यातून सहरकर यांच्या एका मुलीने अर्नाळा येथील समुद्रकिनारी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. पोलिसांना या मृतदेहाची ओळख पटलेली नसल्यामुळे ते शोध घेत होते. त्यातच सहरकर यांच्या दुसऱ्या मुलीनेही आज मॉर्निंग वॉकला जाण्याच्या बहाण्याने समुद्रकिनारी आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू इतर नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचवण्यात यश आलं. यानंतर मुलीच्या चौकशीदरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अर्नाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT