Maharashtra@61 : जाणून घ्या काय म्हणत आहेत ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्र दिवस हा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. या महाराष्ट्रातलं एक आकर्षक शहर आहे ते म्हणजे मुंबई. भारत देशाची एक छोटी आवृत्ती असं मुंबईला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही असं मत आज महाराष्ट्र दिनी ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

आपल्यावर आज घडीला संकट आलं आहे. गेल्या वर्षीही हेच कोरोनाचं संकट होतं. काही प्रमाणात ते कमी झालं होतं आता पुन्हा एकदा हे संकट वाढलं आहे. त्याला तोंड देणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असंही सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे. दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भीषण आहे, डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांनी मागच्या लाटेतही मेहनत केली होती. याही वेळी ते प्रचंड मेहनत करत आहेत. त्याची आपण सगळ्यांनी जाण ठेवली पाहिजे. त्यांना सगळ्यांना सहकार्य करता आलं तर जरूर करा.

गेल्या वर्षी लस नव्हती, मात्र आता ती उपलब्ध होते आहे. त्यामुळे लस घ्या आणि स्वतःला सुरक्षित करून घ्या, स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. इतरांसाठी जगून हा महाराष्ट्र दिन मोठा करूया असंही सचिन पिळगावकर यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT