रायगड : ND स्टुडीओ ला लागलेली आग नियंत्रणात
मुंबई-पुणे महामार्गावर कर्जत जवळ प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ND स्टुडीओला आज दुपारी १२ वाजल्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीत सेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलेलं आहे. ND स्टुडीओमधील जोधा अकबर चित्रपटाचा सेट आहे. यामधील किल्ल्याच्या सेटजवळील […]
ADVERTISEMENT
मुंबई-पुणे महामार्गावर कर्जत जवळ प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या ND स्टुडीओला आज दुपारी १२ वाजल्याच्या दरम्यान भीषण आग लागली होती. या आगीत सेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं कळतंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आलेलं आहे.
ADVERTISEMENT
ND स्टुडीओमधील जोधा अकबर चित्रपटाचा सेट आहे. यामधील किल्ल्याच्या सेटजवळील फायबर मूर्तींच्या गोडाउनजवळ ही आग लागल्याचं कळतंय. आग लागल्याची बातमी समजताच अग्नीशमन दलाला तात्काळ पाचारण करण्यात आलं. अग्नीशमन दलाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. या आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नसलं तरीही सेटमागे असलेल्या गवताला वाढत्या उन्हामुळे आग लागली आणि ती आग सेटपर्यंत पोहचली असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. या आगीत ND स्टुडीओचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT