नागपुरात कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या हॉस्पिटलला आग, चार जणांचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरच्या वेलट्रीट कोव्हिड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीमुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तीन रूग्णांचा मृत्यू आगीमुळे तर एका रूग्णाचा मृत्यू आधीच झाला असल्याची माहिती समजली आहे. 30 रूग्णांना इतर रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे मात्र त्यातल्याही काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी होईल असं पालकमंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यातली परिस्थिती बिकट होत चाललेली आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रत्येक दिवशी येणारा ताण हा राज्य सरकारच्या चिंतेत अधिक भर घालतो आहे. अशा परिस्थितीत नागपूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या वेल ट्रीट हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री साडे आठ वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नागपूर-अमरावती मार्गाजवळ वाडी परिसरात हे हॉस्पिटल आहे. एसीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ICU मध्ये ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याचं लक्षात आल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवरही उपचार होत होते.

हे वाचलं का?

दरम्यान या घटनेत रुग्णांना बाहेर काढताना एक डॉक्टर जखमी झाल्याचं कळतंय. अग्नीशमन दल आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी रुग्णांना वेळेत बाहेर काढून मोठा अनर्थ होण्यापासून रोखला आहे. एकीकडे नागपुरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अनेक रुग्णालयात उपचारासाठी बेड्स शिल्लक नसल्यामुळे आजच काही रुग्णांना अमरावतीला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा परिस्थितीत अशा आग लागण्याच्या घटना प्रशासनासमोरील चिंता आणखीनच वाढवत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT