Kalyan Crime: तोकडे कपडे घातलेल्या दोन तरूणींचा विनयभंग करणाऱ्या पाच आरोपींना अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कल्याण: केवळ तोकडे कपडे घातल्याचे कारण देत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली होती.

ADVERTISEMENT

हे सगळं प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नव्हतं तर या टवाळखोरांनी तरूणींचे कपडे फाडून विनयभंगाचा प्रयत्न देखील केला होता. ही घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली होती.

हिल लाईन पोलिसांनी या प्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंद करत आरोपींचा शोध सुरु केला होता. याप्रकरणी, पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहेत.

हे वाचलं का?

यापैकी तीन मुलं ही अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. तर उरलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

ADVERTISEMENT

मलंगगड भागात दोन तरूण आणि दोन तरूणी असे चौघेजण फिरायला गेले होते. त्यावेळी तुम्ही इथे तोकडे कपडे घालून का आलात? अशी विचारणा मलंगगड भागात असलेल्या 6 ते 8 जणांच्या टोळक्याने त्यांना केली. एवढंच नाही तर त्यासाठी या सगळ्यांना चोपही देण्यात आला.

ADVERTISEMENT

चोप दिल्यानंतर या टवाळखोरांनी मुलींचा विनयभंगही केला. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेलेल्या या चौघांच्याही पदरी निराशा पडली होती.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेत नेवाळी पोलीस ठाणं गाठलं होतं. मात्र, पोलिसांकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही हिल लाईनला जा असे सांगत वाटेला लावलं होतं.

अखेर यातल्या एका पीडित तरूणीने या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. ज्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता.

अखेर आता याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहेत. यापैकी तीन मुले ही अल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडी बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे तर उरलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आज उल्हासनगर सत्र न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तोकडे कपडे घातल्याचा जाब विचारत मलंगगड भागात तरूणांना मारहाण, दोन तरूणींचा विनयभंग

या घटनेनंतर मलंगगड परिसर सर्वसामान्यांसाठी नाहीच का? तरुणींनी नेमका कोणता पेहराव करावा हे ठरविण्याचा अधिकार यांना दिला कोणी? असा सवाल उपस्थित करत अशा समाजकंटकांवर कारवाई करत वेळीच याला आवर घातला जावा अन्यथा नागरिकांना पर्यटन स्थळी देखील स्वताच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेऊनच जावे लागणार का? असा प्रश्न देखील विचारला गेला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT