नागपूरमधल्या कुही तालुक्यात आमनदीमध्ये पाच महिला बुडाल्या, एकीचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नागपूरमधल्या कुही तालुक्यात असलेल्या आमनदीमध्ये छोटी नाव फुटल्याने पाच महिला बुडाल्या. यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ADVERTISEMENT

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील पोलीस स्टेशन वेलतूर अंतर्गत आज रोजी सकाळी 10.30 वाजता दरम्यान मौजा कुजबा येथील 5 महिला शेतातील कापूस वेचण्याकरिता आम नदीच्या पलीकडील शेतमालक परमानंद तिजारे रा. टाकली यांच्या शेतामध्ये जात होत्या. शेतमालक तिजारे यांच्याच मालकीच्या होडीने जात असताना आम नदीच्या पात्रात अचानक ही नाव फुटल्याने नावेत पाणी भरलं. या नावेतबसलेल्या महिला घाबरल्याने नाव उलटली आणि पाच जणी बुडाल्या.

या घटनेत गीता रामदास निंबारते या महिलेचा मृत्यू झाला. तर मनू सुरेश साळवे , मनिषा राजू ठवकर, लक्षमी लोमेश्वर गिरी , मंगला देवराव भोयर आणि परमानंद रामचंद्र तिजारे हे सगळे वाचले आहेत. या सगळ्यांवर प्राथमिक आरोग्य केंद्र मांढळ येथे उपचार करण्यात आले. त्यापैकी लक्ष्मी लोमेश्वर गिरी आणि परमानंद रामचंद्र तिजारे यांना प्राथमिक उपचार करून नागपुरातील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT