कोल्हापूर : धरण क्षेत्रात अतिवृष्टी, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्याच्या धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. गेले २-३ दिवस राज्यात उसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसाचा फटका कोल्हापूरला बसताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासून मुसळधार पावसामुळे सकाळच्या सत्रातपर्यंत ४३ बंधारे पाण्याखाली गेले होते.

ADVERTISEMENT

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात महत्वाची नदी म्हणून ओळख असलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीतही कमालीची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे पंचगंगेची पातळी १२ फुटांनी वाढून २५ फुटापर्यंत पोहचली आहे. कोल्हापूरच्या गारगोटी मार्गावरील माजगावच्या पर्यायी पुलाचा रस्ताही या पावसामुळे वाहून गेला आहे. अजुनही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे वाचलं का?

या पावसाचा जिल्ह्यातील अनेक गावांना फटका बसला आहे. शाहूवाडी तालुक्यातील गोगवेनजीक भलंमोठं झाड रस्त्यावर कोसळून रस्ता बंद झाला आहे. याव्यतिरीक्त भडगाव पूलही पाण्याखाली गेल्यामुळे गडहिंग्लज-चंदगड मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

जिल्हा प्रशासनाने राधानगरी, तुळशी, वारणा, घटप्रभा, कुंभी. पाटगाव या प्रकल्पांमधून विसर्ग सुरु केला आहे. सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान पंचगंगेची पातळी ही वाढून २७ फुटांवर गेली आहे. पंचगंगेची इशारा पातळी ही ३९ फूट तर धोक्याची पातळी ही ४३ फुट आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या नवीन माहितीनुसार ४८ बंधारे सध्या पाण्याखाली गेले असून पावसाचा जोर असचा कायम राहिल्यास कोल्हापुरात पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे,

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT