NCP पाठोपाठ आता BJP आमदार देखील एक महिन्याचा पगार देणार पूरग्रस्तांना

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत प्रसिद्धीपत्रकात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे.’

‘त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांनांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना करीत आहोत.’ अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार-खासदार देखील देणार आपला एक महिन्याचा पगार

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसने देखील असाच निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदार आपलं एक महिन्याचं वेतन हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार असल्याचं उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. सांगलीत पूरसदृष्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना आधीच सूचना दिल्या आहेत. अशी माहिती अजित पवारांनी दिली होती.

ADVERTISEMENT

औषधाचा पुरवठा कमी पडू देणार नसल्याचंही यावेळी अजित पवारांनी स्पष्ट केलं होतं. राज्य सरकार, केंद्र सरकार मदत करत आहे. पण जनतेनंही फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं होतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार, मंत्री यांचं एक महिन्याचं मानधन देणार असल्याची घोषणाही देखील अजित पवार यांनी केली होती.

राज्य सरकारकडून देखील मदतीची घोषणा

राज्यातील 8 ते 9 जिल्ह्यांत पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. यावेळी कोकणातील चिपळूण, खेड, महाड तर पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा, सांगली, कोल्हापूर या भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. दरम्यान, या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आढावा घेतल्यानंतर तात्काळ मदतीची घोषणा केली होती.

Narayan Rane: ‘थांब रे, मध्ये बोलू नको’, पाहा नारायण राणे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांना असं का म्हणाले!

पुराचं पाणी घरामध्ये तसेच दुकानांमध्ये शिरुन मोठ्या प्रमाणात अनेक जणांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अशा पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार आणि अन्नधान्य खरेदीसाठी 5 हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी या निर्णयाबाबतची घोषणा केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT