कल्याण : वास्तू सल्लागाराच्या कार्यालयातून घोरपडीचे अवयव जप्त, वनविभागाची कारवाई
कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभागाच्या कल्याण शाखेने छापा टाकत २५० इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) आणि ८० जोडी घोरपडीचे अवयव जप्त केले आहेत. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिलेसह तिच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक करण्यात आली आहे .या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या […]
ADVERTISEMENT
कल्याणमधील एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो आणि वन विभागाच्या कल्याण शाखेने छापा टाकत २५० इंद्रजाल (काळा समुद्री शैवाळ) आणि ८० जोडी घोरपडीचे अवयव जप्त केले आहेत. याप्रकरणी वनविभागाकडून वास्तू सल्लागार महिलेसह तिच्या कार्यालयातील कर्मचारी नवनाथ घुगे आणि अक्षय देशमुख अशा तिघांना अटक करण्यात आली आहे .या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यालयात का आणल्या याचा तपास सुरु असल्याचे वन विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
कल्याण पश्चिमेकडील संतोषी माता रोडवरील मॅक्सी ग्राउंडसमोरील इमारतीत असलेल्या एका महिला वास्तू सल्लागाराच्या कार्यालयात दुर्मिळ व बाळगण्यास बंदी असलेली काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे व घोरपडीचे अवयव असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरोला माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन्यजीव गुन्हे अन्वेषण ब्युरो विभागीय उपसंचालक योगेश वारकड आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी धाड टाकली असता या कार्यालयात २५० काळ्या समुद्र शैवाळाचे तुकडे आणि ८० जोड्या घोरपडीचे अवयव आढळून आले. या पथकाने मुद्देमालासह तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीसकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या वस्तूंचा साठा करण्यास किंवा या वस्तू जवळ बाळगण्यास कायद्याने बंदी असतानाही इतक्या मोठय प्रमाणावर या वस्तूचा साठा का करण्यात आला होता याची चौकशी सुरु असल्याचे वनविभागाचे अधिकारी चन्ने यांनी सांगितले. दरम्यान इंद्रजाल आणि घोरपडीचे अवयव घरात, कार्यालयात, दुकानात ठेवल्यास सुखशांती आरोग्य आणि लक्ष्मी घरात नांदते, या अंधश्रद्धेपोटी या वस्तू बाळगल्या जात असून काळी जादू करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो. आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील या वस्तू वापरल्या जातात मात्र या वस्तू जवळ बाळगण्यास किंवा त्यांची विक्री करण्यास वन्यजीव कायदा १९७२ अन्वये मज्जाव करण्यात आला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT