सोलापूर : कासवविक्री करणाऱ्या तरुणाला अटक, दहा कासवं जप्त
सोलापुरात लॉकडाउन सुरु असतानाही अवैध पद्धतीने Pet Shop सुरु ठेवून कासवांची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आसरा चौक परिसरातील एका दुकानात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वनविभागाने अटक केलेला तरुण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. ३४ वर्षीय अमोल पोरेला अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता […]
ADVERTISEMENT
सोलापुरात लॉकडाउन सुरु असतानाही अवैध पद्धतीने Pet Shop सुरु ठेवून कासवांची विक्री करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. आसरा चौक परिसरातील एका दुकानात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत ही कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
महत्वाची गोष्ट म्हणजे वनविभागाने अटक केलेला तरुण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. ३४ वर्षीय अमोल पोरेला अटक करुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता त्याला या प्रकरणात जामिन मिळाला आहे. वनविभागाने अमोल पोरेच्या दुकानात असलेली १० कासवं ताब्यात घेतली असून बाजारात या कासवांची किंमत तीन लाखांच्या घरात असल्याचं कळतंय. कासव पाळणं आणि विक्री करणं हा गुन्हा आहे. तरीही अमोल दुकानात कासवांची विक्री करत होता.
हे वाचलं का?
आसरा चौकात आरोपी अमोल पोरेचं Pet Shop आहे. या दुकानात अमोलने स्टार बॅक प्रजातीचं कासव विकत असल्याची माहिती वनविभागाल मिळाली होती. या माहितीवरुन वनविभागाने बनावट ग्राहक बनून अमोलशी संपर्क साधला. यानंतर कासव खरेदी करण्याच्या बहाण्याने अमोलच्या दुकानावर गेलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्याला अटक केली आहे. ही सर्व कासवं वनविभागाने पुणे येथील वनविभागाच्या मुख्यालयात पाठवली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT