राहुल बजाज यांना कोणता आजार होता?; डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिली माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं आज (12 फेब्रुवारी) दुपारी निधन झालं. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राहुल बजाज यांच्या निधनाची माहिती रुबी हॉल क्लिनिकचे एमडी डॉ. परवेझ ग्रांट यांनी दिली. राहुल बजाज यांच्यावर कोणते उपचार सुरू होते याबद्दलही डॉ. ग्रांट यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

बजाज उद्योग समूहाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारे आणि देशातील अग्रगण्य उद्योगपतींपैकी एक असलेले राहुल बजाज यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते.

स्पष्टवक्ता उद्योजक काळाच्या पडद्याआड! बजाज समुहाचे सर्वेसर्वा राहुल बजाज यांचं निधन

हे वाचलं का?

रुबी हॉल क्लिनिकचे एमडी डॉ. परवेझ ग्रांट यांनी राहुल बजाज यांच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल बजाज यांना कोणत्या आजाराचं निदान झालं होतं, याचीही माहिती दिली. डॉ. परवेझ ग्रांट म्हणाले, ‘राहुल बजाज यांचं आज 2:30 वाजता निधन झालं. त्यांना ह्रदय आणि फुफ्फुसाशी संबंधित त्रास होता. एका महिन्यापासून ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल होते. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं,’ असं डॉ. ग्रांट यांनी सांगितलं.

‘राहुल बजाज यांच्या पार्थिवावर उद्या (13 फेब्रुवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांचे पार्थिव आज रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे,’ असंही डॉ. ग्रांट म्हणाले.

ADVERTISEMENT

राहुल बजाज अमित शाहांना म्हणाले ‘यूपीएच्या काळात असं नव्हतं’; काय घडलं होतं त्या कार्यक्रमात?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

राहुल बजाज यांच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं. त्याचबरोबर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ‘राहुल बजाज यांच्या निधनानं भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही, तर सामाजिक भान असलेला आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मतं मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राहुल बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले, असंही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT