माजी केंद्रीय मंत्री ऑस्कर फर्नांडीस यांचं निधन, मंगळुरुतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नांडीस यांचं आज निधन झालं. कर्नाटकातील मंगळुरु येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, या उपचादादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ADVERTISEMENT

८० वर्षीय ऑस्कर फर्नांडीस गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. योग अभ्यास करताना फर्नांडीस यांना जखम झाली होती ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. मंगळुरुतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ऑस्कर फर्नांडीस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या ऑस्कर फर्नांडीस हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या जवळचे नेते मानले जात होते. ऑस्कर फर्नांडीस सध्या राज्यसभेवर होते. युपीए सरकारच्या दोन्ही कार्यकाळात फर्नांडीस यांनी मंत्रीपद भूषवलं आहे.

हे वाचलं का?

१९८० साली कर्नाटकच्या उडप्पी लोकसभा मतदार संघातून फर्नांडीस पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. १९९६ पर्यंत फर्नांडीस या मतदार संघातून कायम जिंकत आले. १९९८ साली काँग्रेसने त्यांना राज्यसभेत पाठवलं. यानंतर आतापर्यंत फर्नांडीस राज्यसभेचे खासदार होते. २७ मार्च १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT