लॉकडाउन लावायचा असेल तर या ६ गोष्टी लक्षात ठेवा, पृथ्वीबाबांचा उद्धव ठाकरेंना सल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला त्यांच्याच सरकारमधून विरोध होत असला तरीही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना मोलाचा सल्ला दिला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहून लॉकडाउन लावण्याची अपरिहार्यता आल्यास सहा प्रमुख गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

ADVERTISEMENT

उद्धवजी आता परत लॉकडाउन नको ! संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

काय म्हणतात पृथ्वीराज चव्हाण?

हे वाचलं का?

  • लॉकडाउनची अंमलबजावणी करण्याआधी सर्वसामान्य जनतेला पूर्वसूचना द्या.

  • लॉकडाउनचा कालावधी कमीत-कमी ठेवा.

  • ADVERTISEMENT

  • या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने रोख रकमेद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करणे, पाश्चिमात्य देशांमध्ये असे प्रकार केले जातात. यासाठी प्रसंगी आमदार व खासदार स्थानिक विकास निधीचा वापर करावा.

  • ADVERTISEMENT

  • खाजगी वाहनातून प्रवासास मुभा द्यावी.

  • शेतमाल तसेच इतर औद्योगिक मालाची वाहतूक चालु ठेऊन पुरवठा साखळीवर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी.

  • लसीकरणाचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढवावं.

  • ED च्या तारखा पाहून मला कोरोना होत नाही, गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

    यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी मागच्या वर्षी केंद्र सरकारने कोणतीही सूचना न देता जाहीर केलेल्या लॉकडाउनवरही टीका केली. “केंद्र सरकारने गेली वर्षी मार्च मध्ये अचानकपणे कोणतेही नियोजन न करता लॉकडाउन घोषित केलं होतं. सारासार विचार न करता घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला. भारतातील ३ कोटींहून अधिक लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले.” त्यामुळे राज्यातील जनतेला विश्वासात घेऊन अर्थव्यवस्थेचे कमीत-कमी नुकसान होईल आणि कोरोना संसर्गाची साखळी मोडण्यास मदत ठरेल अशा प्रकारे लॉकडाउनचे नियोजन करणं आवश्यक असल्याचा सल्ला पृथ्वीराज चव्हाणांनी दिला आहे.

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT