विधीमंडळाचं ‘विद्यापीठ’ शांत! Former MLA गणपतराव देशमुख यांचं निधन
माजी आमदार आणि महाराष्ट्रातले मोठे नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. विधीमंडळाचं विद्यापीठ अशी त्यांची ओळख होती. 10 ऑगस्ट 1926 ला त्यांचा जन्म झाला होता. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते 11 वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात […]
ADVERTISEMENT
माजी आमदार आणि महाराष्ट्रातले मोठे नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. विधीमंडळाचं विद्यापीठ अशी त्यांची ओळख होती. 10 ऑगस्ट 1926 ला त्यांचा जन्म झाला होता. 1962 ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते 11 वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते.
ADVERTISEMENT
गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अश्विनी रूग्णालयात 15 जुलैपासून उपचार सुरू होते. आज उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांचे कुटुंबीय त्यांच्यासोबत होते. दीर्घ आजारासोबत सुरू असलेली त्यांची झुंज आज अखेर संपली. सोलापूर येथील अश्विनी रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे वाचलं का?
गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांची प्रतिक्रिया
गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री 9 वाजता आबासाहेबांचं निधन झालं.’
ADVERTISEMENT
गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. शरद पवार यांनी जेव्हा पुलोद सरकारचा प्रयोग केला त्यावेळी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला होता. 1999 लाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. 2012 मध्ये विधानसभेतल्या त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याने सभागृहासह सरकारने त्यांचा गौरव केला होता.
ADVERTISEMENT
विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख यांनी मोडला होता.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून 11 वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला होता.
2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून एम.करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार ठरले होते.अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले होते.
1977 मध्ये गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभेचं विरोधी पक्षनेते पदही सांभाळले होते. त्यानंतर 1978 मध्ये शरद पवार यांच्या पुलोदच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. त्यानंतर 1999 ला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळातही गणपतराव देशमुख होते. साधी राहणी आणि एस.टी.ने प्रवास करण्याची त्यांची सवय यामुळे ते लोकप्रिय झाले होते.
गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते. या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी जवळीक निर्माण झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले. 1962 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली. पहिली निवडणूक लढवत असताना दुष्काळग्रस्त सांगोल्यातील जनतेला पाणी मिळालं पाहिजे यासाठीचा लढा त्यांनी सुरू केला होता. आपल्या आयुष्यातील 50 वर्षे त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांची कामं पाहिली होती. यशवंतराव चव्हाण यांचंही काम त्यांनी जवळून पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने विधीमंडळाचं विद्यापीठ हरवलं आहे अशीच भावना व्यक्त होते आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT