महाराष्ट्र सरकार हात धुवून मागे लागल्याचं म्हणत परमबीर सिंग यांची पुन्हा कोर्टात धाव

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकार माझ्या मागे हात धुवून लागलं आहे असंही परमबीर सिंग यांनी कोर्टाला सांगितलं आहे. यावेळी परमबीर सिंग यांनी त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि चौकशा यासंदर्भात कोर्टात धाव घेतली आहे. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सिंग यांची बाजू कोर्टात मांडली. न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि मनिष पितळे यांच्या खंडपीठाला सांगितलं की महाराष्ट्र सरकार माझे अशील परमबीर सिंग यांच्यामागे हात धुवून लागलं आहे. परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आधी सुप्रीम कोर्टात आणि मग बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. याकडेही रोहतगी यांनी माननीय कोर्टाचं लक्ष वेधलं.

ADVERTISEMENT

अनिल देशमुख हे गृहमंत्री पदावर असताना त्यांनी API सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून महिन्याला शंभर कोटी रूपये वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा आरोप करणारं हे पत्र परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र यावर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे आणि अर्थहीन आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर सिंग यांनी आधी सुप्रीम कोर्टात आणि मग बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली होती. बॉम्बे हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना हे प्रकरण प्राथमिक चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवलं ज्यानंतर अनिल देशमुख यांना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आता ठाणे पोलीस करणार चौकशी!

हे वाचलं का?

परमबीर सिंग यांनी काय आरोप केले आहेत?

पोलिसांच्या नियुक्त्या, बदल्यांसाठी अनिल देशमुख पैशांची मागणी करतात. तपासकार्यात ते वारंवार हस्तक्षेप करतात असे आरोप परमबीर सिंग यांनी याचिकेत केले होते. त्यासाठी त्यांनी राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अहवालाचा, निलंबित अधिकारी सचिन वाझे व संजय पाटील यांना महिन्याला 100 कोटी वसूल करण्याचे दिलेले आदेश दादरा नगर नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा दाखला दिला होता. तसेच राज्याच्या गृहमंत्र्यांकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराची सीबीआयमार्फत चौकशी होणं आवश्यक आहे तसे आदेश द्या अशीही मागणी परमबीर सिंग यांनी केली होती.

ADVERTISEMENT

परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल, आता ठाणे पोलीस करणार चौकशी!

ADVERTISEMENT

दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir sing) यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात काल (बुधवार) रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध 22 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा दाखल करून हे संपूर्ण प्रकरण आता ठाणे शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी भीमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रारही त्यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांसह डझनभर पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT