राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या हाती ‘शिवबंधन’; बोरणारेंविरोधात ठाकरेंचा उमेदवार फायनल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबाद : वैजापूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज (बुधवारी) ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासह अॅड. प्रतापराव पाटील निंबाळकर, प्रतापराव पाटील धोर्डे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही भगवा हातात घेतला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

ADVERTISEMENT

यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ. विनोद घोसाळकरही उपस्थित होते. दरम्यान, चिकटगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे वैजापूरचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार रमेश बोरणारे यांच्याविरोधातील उमेदवारीसाठी ठाकरे गटाची शोधमोहिम संपली आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

मागील काही दिवसांपासून चिकटगावकर राष्ट्रवादीत नाराज असल्याचं वृत्त होतं. नुकतचं त्यांनी पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. जिल्हा परिषदेच्या राजकारणात भाऊसाहेब ठोंबरे, पंकज ठोंबरे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देण्यात आला होता. पक्षाचा हा विस्तार मान्य नसल्याचे सांगत पक्षातून मला मुक्त करा असं ते म्हणाले होते.

हे वाचलं का?

काही दिवसांपूर्वी चिकटगावकर यांनी आमदार सतिश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले होते. प्रत्येक विधानसभा निवडणुकीआधी आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात सतीश चव्हाण एक गट तयार करून त्यांना पाडण्याचा प्रयत्न करत असतात, असा आरोप त्यांनी केला होता. तसंच औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आमदार कसा निवडून येणार नाही यासाठीही सतीश चव्हाण प्रयत्न करत असल्याचा आरोप चिकटगावकर यांनी केला होता.

पैठणमध्ये भाजपला खिंडार :

वैजापूरमध्ये राष्ट्रवादीला बसलेल्या धक्क्यापाठोपाठ पैठणमध्येही भाजपला मोठे खिंडार पडले आहे. भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील आणि डॉ. पांडुरंग राठोड यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन हाती बांधलं. गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांनीही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT