विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांना काळाने रस्त्यातच गाठलं; एकाच कुटुंबातील चौघे ठार
लेकुरवाळ्या विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर रस्त्यातच दबा धरून बसलेल्या काळाने झडप घातली. विठ्ठलाच्या दर्शनाआधीच एका विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली रोडवर वैरागड घाटात मोहाडी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. […]
ADVERTISEMENT
लेकुरवाळ्या विठू माऊलीच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर रस्त्यातच दबा धरून बसलेल्या काळाने झडप घातली. विठ्ठलाच्या दर्शनाआधीच एका विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव चिखली रोडवर वैरागड घाटात मोहाडी जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चारजण जागीच ठार झाले आहेत. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
हे वाचलं का?
मृतांमध्ये सर्व एकाच परिवारातील असल्याची माहिती मिळाली असून सदर घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली. यात 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. अकोला येथील भाविक प्रवासी जीपने (एमएच 30 एए 2255) पंढरपूरकडे जात होते.
दरम्यान, मोहाडी नजीक एका मालवाहू वाहनाने सुरूवातीला महावितरण कंपनीच्या प्रवासी गाडीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू जीप अकोला येथील प्रवाशांच्या वाहनावर येऊन धडकून झालेल्या विचित्र अपघातात पंढरपूर येथे जाणारे 4 भाविक जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अपघातातील जखमी आणि मृतक सर्वजण अकोला येथील रहिवासी असल्याचे समजते. तर मालवाहू आणि महावितरणच्या वाहनातील प्रत्येकी एकजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अपघातील किरकोळ जखमी परस्पर खासगी रूग्णालयात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. एक इसम गंभीर जख्मी असल्यामुळे उपचारासाठी त्याला अकोला रेफर करण्यात आले आहे.
मृतांची नावं
श्यामसुंदर रोकडे (५५)- चालक विश्वनाथ कराड (७२) शकुंतला कराड (६८) बाळकृष्ण खर्चे (७०)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT