भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क मैदानात होणार अंत्यसंस्कार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज (6 फेब्रुवारी) सकाळी साडे आठ वाजत निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आला होतं. त्यांना कोरोनावर मात केली होती, मात्र न्यूमोनियाचा त्रास सुरू झाल्याने त्या मागील अनेक दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे.

शिवाजी पार्कवर पार पडणार अंत्यसंस्कार

हे वाचलं का?

लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर दादरमधील शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याआधी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत पेडर रोड येथील प्रभाकुंज या त्यांच्या घरी अंत्य दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 4.30 वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

Lata Mangeshkar Passed away: युगान्त…
स्वर अन् सूर गहिवरले! गान कोकिळा लता मंगेशकर यांचं निधन

ADVERTISEMENT

लता मंगेशकर यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला?

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मागील 28 दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यांना कोरोना झाला होता. तसंच निमोनियाही झाला होता. आज मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं आहे. अत्यंत दुःखद अशीही घटना आहे. त्यांची प्रकृती सुधारावी आणि त्यांना आराम मिळावा म्हणून आम्ही शर्थीचे प्रयत्न करत होतो मात्र आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. असं डॉक्टर प्रतित समदानी यांनी स्पष्ट केलं आहे.

चित्रपट संगीत आणि भावगीत या दोन महत्त्वाच्या प्रवाहांना अभिजाततेचं परिमाण देत भारतीय जनमानसावर गेली आठ दशकं अधिराज्य गाजवणारा स्वर आज निमाला. गान कोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. त्या ९३ वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. कोरोनावर मात केली होती, मात्र त्रास सुरू झाल्यानं त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला निमोनिया झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांना ब्रीचकॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच त्यांना कोरोनाचा संसर्गही झाला होता. मात्र, औषधोपचाराच्या मदतीने त्यांनी कोरोनावर मातही केली होती. रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यानंतर त्यांची अचानक प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT