Gautami Patil: अजित पवारांचा इशारा, गौतमी पाटीलने जोडले हात, म्हणाली…
Gautami Patil explanation after Ajit Pawar warning : गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. गौतमी पाटीलवर सातत्यानं अश्लील हावभाव लावणी सादर करण्याचा आरोप होतोय, तसे व्हिडीओही व्हायरल झाले. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा इशारा दिला. त्यानंतर […]
ADVERTISEMENT
Gautami Patil explanation after Ajit Pawar warning : गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय. गौतमी पाटीलवर सातत्यानं अश्लील हावभाव लावणी सादर करण्याचा आरोप होतोय, तसे व्हिडीओही व्हायरल झाले. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आणि त्यांनी थेट अधिवेशनात मुद्दा मांडण्याचा इशारा दिला. त्यानंतर गौतमी पाटीलने हात जोडत माफी मागितली. (Gautami Patil apologized to Ajit Pawar over vulgar dance)
ADVERTISEMENT
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना विरोध होतोय. गौतमी पाटील नृत्य करताना अश्लील हावभाव करत असल्यानं तिच्यावर टीका होतेय. गौतमी पाटीलच्या अनेक कार्यक्रमांमध्ये गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडूनच गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला.
कोण आहे गौतमी पाटील? कुठे झालंय शिक्षण?
हे वाचलं का?
हा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कठोर भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित न करण्याचेच आदेश दिले. इतकंच नाही, तर त्यांनी अधिवेशनातही हा मुद्दा मांडणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
त्यानंतर गौतमी पाटीलने हात जोडत अजित पवारांची माफी मागितली. गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ समोर आला. त्यात ती म्हणते, “मी चुकले होते. तिथून मी सुधरले. लोकांना माझं चांगलं दिसत नाहीये का? ते का दाखवत नाहीये. मी साडी नीट घालतेय. पायात घुंगरू आहेत. पाणी ओतत नाही. सगळे कार्यक्रम व्यवस्थित करतेय. हे का येत नाही.”
ADVERTISEMENT
पुढे गौतमी पाटीलने म्हटलंय की, “दादा खूप मोठे आहेत. दादा मी काही बोलू शकत नाही. दादांना माझं एकच म्हणणं आहे की, मी चुकले, तेव्हा माफी मागितली होती. माझ्याकडून चुका झाल्या होत्या. मी माफी मागितली, तरीही काहीजण मला ट्रोल करतात. ते कोण हे मला माहिती नाहीये”, असं म्हणत तिने माफी मागितली आहे.
Gautami Patil: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात महिला दांडके घेऊन का आल्या?
ADVERTISEMENT
अजित पवार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणाले होते?
काही दिवसांपूर्वी अजित पवारांना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले होते की, “हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला कमीपणा आणणारं. महाराष्ट्राची काही परंपरा आहे. लावणी असो वा इतर… ते कार्यक्रम सर्वांना पाहता येतील असे झाले पाहिजे. त्याच्यामध्ये अश्लील प्रकार होता कामा नये.”
“दुर्दैवाने मला अशी माहिती मिळाली की, काही जिल्ह्यात बंदी आहे पण काही जिल्ह्यात ते चालू आहे. तर ते नक्की काय आहे, याबद्दल संबंधितांशी बोलणार आहे आणि वेळ पडली तर आगामी अधिवेशनात हा मुद्दा मांडून अशा प्रकार महाराष्ट्रात घडता कामा नये. कुणी चुकीचं वागत असेल, तर त्याला पायबंद घातला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे आणि ती मी सभागृहात मांडणार”, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT