‘वड्डी’ला मिळाली फॉरेन रिटर्न ‘सरपंच’! यशोधरा शिंदेंच्या हाती कारभार
–स्वाती चिखलीकर, सांगली जॉर्जियात वैद्यकीय उच्चशिक्षण घेतलेली तरुणी आता गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरलीये. तिचं नाव यशोधरा महेंद्रसिंग शिंदे! यशोधरा शिंदेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील वड्डीला उच्चशिक्षित सरपंच मिळालाय. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत यशोधरा शिंदे आणि तिच्या पॅनेलचा एकतर्फी विजय झालाय. त्यामुळेच या फॉरेन रिटर्न सरपंचाची जिल्ह्यात चर्चा होतेय. राज्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. निकालही लागलेत. कुठे […]
ADVERTISEMENT
–स्वाती चिखलीकर, सांगली
ADVERTISEMENT
जॉर्जियात वैद्यकीय उच्चशिक्षण घेतलेली तरुणी आता गावाच्या विकासासाठी राजकारणात उतरलीये. तिचं नाव यशोधरा महेंद्रसिंग शिंदे! यशोधरा शिंदेच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील वड्डीला उच्चशिक्षित सरपंच मिळालाय. थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत यशोधरा शिंदे आणि तिच्या पॅनेलचा एकतर्फी विजय झालाय. त्यामुळेच या फॉरेन रिटर्न सरपंचाची जिल्ह्यात चर्चा होतेय.
राज्यात 7,751 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. निकालही लागलेत. कुठे 70 वर्षाच्या आजी सरपंच झाल्यात, तर कुठे गुराखी. सांगली जिल्ह्यातील वड्डीच्या ग्रामस्थांनी एका उच्चशिक्षित तरुणीला गावाच्या विकासाची संधी दिलीये.
हे वाचलं का?
जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंग शिंदे ही सांगली जिल्ह्यातील ‘वड्डी’ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी निवडून आली आहे. या निवडणुकीत शिंदे यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय झाला असून सर्व जागेवर उमेदवार निवडून आले आहेत.
Gram panchayat election results Live : ग्रामपंचायत निकालात कोणी मारली सरशी? पाहा आकडेवारी
ADVERTISEMENT
सांगली जिल्ह्यातील सुमारे पाच हजार लोकवस्तीचं छोटंसं गांव वड्डी! मिरज शहरालगत असणारे हे गाव… या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत विकासाचा मुद्दा उपस्थित करत जॉर्जिया येथे वैद्यकीय शिक्षण घेतलेली तरुणी यशोधरा महेंद्रसिंग शिंदे हिने ही ग्रामपंचायत निवडणुक लढवून आता ती सरपंच पदावर विराजमान झाली आहे.
ADVERTISEMENT
परदेशात जशा सुविधा असतात तसं शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि नागरी सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतच का नाहीत? या विचारातून या मुलीने थेट निवडणूक रिंगणात उडी घेतली. शाळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना कॉमन टॉयलेट का? विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार ते का नाहीत?
Gram panchayat results : नितेश राणेंनी निधीसाठी धमकी दिलेल्या गावात काय झालं?
परदेशासारखे शाळेत किंवा काही विशिष्ट ठिकाणी सॅनेटरीपॅडचे व्हेंडिंग मशीन्स आपल्या गावखेड्यात का नाहीत? असे प्रश्न घेऊन निवडणुकीचा प्रचार केला. यशोधराने परदेशात पाहिला तसाच गाव आपलाही झाला पाहिजे, हे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवली.
Gram Panchayat results : आईला मुलीचं आव्हान! घरातच ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सामना
तिच्या या वेगळ्या भूमिकेला साद देत मतदारांनी तिला भरघोस मतांनी जिंकून दिलं. अगदी एकतर्फी तिचं संपूर्ण पॅनेल निवडून आलं आहे. पण आता गावकऱ्यांनी खूप मोठी जबाबदारी आपल्या वर टाकली असून या 5 वर्षात ही समर्थपणे सांभाळू असा विश्वास यशोधरा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT