डोंबिवली : 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या चिमुकलीचा मृतदेह काढला बाहेर, कारण…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सहा महिन्यांपूर्वी एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. मृत्यू झाला त्यावेळी तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आता तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी मृतदेहाच्या सांगाड्यातील काही हाडं पुन्हा बाहेर काढण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

बाहेर काढण्यात आलेले मृतदेहाचे अवशेष कलिनी येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवालानंतरच मुलीच्या मृत्यूचं कारण कळू शकणार आहे. या प्रकरणी मयत मुलीच्या पालकांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे. न्यायालयाने आरोपी डॉक्टरसह त्याच्या सहकाऱ्याला जामीन दिलेला आहे.

काय आहे घटना?

हे वाचलं का?

कल्याण पूर्व भागातील नवी गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा आजारी पडली होती. आई वडिलांनी तिला सूचक नाका येथील डॉ. आलाम यांच्या क्लिनीकमध्ये भरती केलं. डॉक्टरांनी नेहाची तपासणी करून औषधं दिली होती. काही तासानंतर नेहाचा अचानक मृत्यू झाला होता.

डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे नेहाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईवडिलांनी केला होता. मात्र, त्यानंतर नेहाचा मृतदेह दफन करण्यात आला. दफन करण्यापूर्वी नेहाच्या मृतदेहाचं शव विच्छेदन करण्यात आलेलं नव्हतं. कुटुंबियांच्या आरोपाला त्यावेळी आधार नसल्याने पोलिसांसमोर गुन्हा दाखल करण्याचे आव्हान होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, कुटुंबियांनी हे प्रकरण लावून धरले. रेखा चौधरी यांनी या कुटुंबियांना मदत केली. कुटुंबियांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या प्रकरणी प्रथम गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी न्यायायलायाच्या आदेशाने संबंधित डॉक्टरसह साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला.

ADVERTISEMENT

तपास सुरु असताना दोन्ही आरोपींना न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. मात्र, या तपासात महत्त्वाचे असलेल्या फॉरेन्सिक रिपोर्टसाठी कल्याण न्यायालयाने दफन भूमीतून मुलीचे शव बाहेर काढून शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर सोमवारी (6 फेब्रुवारी) तपास अधिकारी गोडे, नायब तहसीलदार सुषमा बांगर आणि डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली दफन करण्यात आलेल्या मुलीची काही हाडे बाहेर काढण्यात आली. ती तपासा करीता फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT