गोव्यात 15 दिवसांचा कर्फ्यू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोनाने कहर माजवलाय. अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रूग्णांमध्ये वाढ होतेय. गोव्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने गोवा सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गोव्यामध्ये कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यात 15 दिवसांचा कर्फ्यू जाहीर केला आहे. येत्या रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून या कर्फ्यूला सुरुवात होणार असून 24 मे पर्यंत हा कर्फ्यू असणार आहे.

मराठी मालिकांचं शूटींग पुन्हा रखडलं; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटींगवर बंदी

हे वाचलं का?

महाराष्ट्रात ल़ॉकडाऊन लावल्यानंतर आता गोव्यातही मुख्यमंत्र्यांनी कर्फ्यूची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, जीवनावश्यक वस्तूंची दुकानं केवळ दुपारी 1 वाजपर्यंत सुरु राहतील. त्याचप्रमाणे नागरिकांनी त्यांचे आखलेले सर्व समारंभ रद्द करावेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT