आत्याच्या अंगावर खाजेची वनस्पती, मुलाकडून आल्याचं सांगत ऐन लग्नसमारंभात दागिन्यांची चोरी
अमरावतीमधील दर्यापूर शहरात एका लग्नसमारंभात घुसून तरुण-तरुणी चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या दोन्ही आरोपींनी गर्दीचा फायदा घेत लोकांमध्ये मिळवून आपण नवऱ्यामुलाकडून आल्याचं सांगितलं. यानंतर नवऱ्या मुलीच्या आत्याला खाजेची वनस्पती लावून संधी साधत दागिने घेऊन पोबारा केला. मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे श्रद्धा वलसिंगे या तरुणीचं लग्नसोहळा सुरु […]
ADVERTISEMENT
अमरावतीमधील दर्यापूर शहरात एका लग्नसमारंभात घुसून तरुण-तरुणी चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. या दोन्ही आरोपींनी गर्दीचा फायदा घेत लोकांमध्ये मिळवून आपण नवऱ्यामुलाकडून आल्याचं सांगितलं. यानंतर नवऱ्या मुलीच्या आत्याला खाजेची वनस्पती लावून संधी साधत दागिने घेऊन पोबारा केला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार दर्यापूर येथील माहेश्वरी भवन येथे श्रद्धा वलसिंगे या तरुणीचं लग्नसोहळा सुरु होता. या सोहळ्यात आरोपी तरुण-तरुणीने हळदीच्या सोहळ्यापासून शिरकाव करत सर्वांना आपण मुलाकडून आल्याचं भासवलं. परिस्थितीचा अंदाज घेत आरोपी मुलाने मुलीच्या आत्याला खाज येणारी वनस्पती लावून तिला खोलीच्या बाहेर व्यस्त ठेवलं. इतक्यातच मुलीने मुलीच्या खोलीत जात मुलाच्या घरच्यांनी दागिने मागितल्याचं सांगितलं.
मुलीच्या घरच्यांनीही विश्वास ठेवत जवळपास १०० ते १२५ ग्रॅम दागिने या आरोपी तरुणीकडे सोपवले. हे दागिने घेऊन हे तरुण-तरुणी घटनास्थळावरुन पसार झाली. काहीकाळाने जेव्हा मुलीकडच्या लोकांना खरी परिस्थिती समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर मुलीच्या घरच्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी लग्नात व्हिडीओ शूट आणि फोटोग्राफरच्या मदतीने आरोपी तरुण-तरुणीची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरु आहे.
हे वाचलं का?
नागपूरमध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा विवाह, लिहून घेण्यात आलं हमीपत्र
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT