भाई का बोलला नाहीस? कुत्र्यासारखं बिस्कीट खायला लावतं गावगुंडांची तरुणाला मारहाण
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होताना दिसतो आहे. गल्लीबोळात स्थानिक टोळ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या नादात होणारी मारामारी आणि धाकदपटशा आता वाढीला लागला आहे. फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने हाक मारल्यामुळे एका तरुणाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. इतकच नव्हे आरोपींनी या तरुणाला बिस्कीट जमिनीवर फेकून कुत्र्यासारखी खायला लावली. पिंपरी-चिंचवड शहराच्या ताथवडे […]
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होताना दिसतो आहे. गल्लीबोळात स्थानिक टोळ्यांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या नादात होणारी मारामारी आणि धाकदपटशा आता वाढीला लागला आहे. फोनवर बोलताना भाई न म्हणता एकेरी नावाने हाक मारल्यामुळे एका तरुणाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे. इतकच नव्हे आरोपींनी या तरुणाला बिस्कीट जमिनीवर फेकून कुत्र्यासारखी खायला लावली.
ADVERTISEMENT
पिंपरी-चिंचवड शहराच्या ताथवडे येथील स्वामी विवेकानंद नगरमधील सुखदा कॉलनीत ही घटना घडली. प्रथमेश दवडे (वय २०) असं जखमी तरुणाचे नाव आहे. आरोपी गंग्या उर्फ रोहन वाघमारेने प्रथमेशला फोनवर शिवीगाळ करत भेटण्यासाठी बोलावलं, यावेळी त्याच्यासोबत चार-पाच साथीदारही होते.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
हे वाचलं का?
मला फोनवर शिवी दिलीस ना? असं विचारत रोहनने प्रथमेशला मारहाण करायला सुरुवात केली. यावेळी प्रथमेशला रोहनने कुत्र्यासारखी बिस्कीटं खायला भाग पाडलं. मी या एरियाचा भाई आहे, तू मला एकेरी नावाने कशी हाक मारली. मला भाई का म्हणाला नाहीस असं म्हणत आरोपी रोहतनने प्रथमेशला शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केली.
यानंतर रोहनसोबतच्या साथीदारांनी प्रथमेशवर तुटून पडत त्याला लाथा-बुक्क्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओही शूट करण्यात आला.
ADVERTISEMENT
गुंडांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर प्रथमेशने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली. वाकड पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत मुख्य आरोपी रोहन वाघमारे, प्रशांत आठडवे, आदित्य काटे, प्रेम शिंदे आणि वाघमारे या पाच आरोपींना अटक केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT