ST Strike: सरकारने निर्णयही जाहीर केला पण ST चा संप मिटला की नाही? हे तर जाणून घ्या
मुंबई: राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेची विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची खूपच अडचण होत आहे. अशावेळी संप मिटावा म्हणून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचं शिष्टमंडळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी बुधवारी (24 नोव्हेंबर) अनेक तास चर्चा केली. या अनेक तासांच्या चर्चेनंतर अनिल […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून संप पुकारला आहे. ज्यामुळे राज्यातील जनतेची विशेषत: ग्रामीण भागातील लोकांची खूपच अडचण होत आहे. अशावेळी संप मिटावा म्हणून राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटीचं शिष्टमंडळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी बुधवारी (24 नोव्हेंबर) अनेक तास चर्चा केली.
या अनेक तासांच्या चर्चेनंतर अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ज्याला गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे देखील हजर होते. आता या सगळ्या दरम्यान, नेमकं काय आणि कसं घडलं हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
सीन क्रमांक 1
याच पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी घोषणा केली की, ‘एसटी कामगारांचे पगार हे वाढविण्यात येत आहेत आणि त्यांचे पगार दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत होतील. पण विलिनीकरणाचा जो मुद्दा आहे त्याविषयी प्रकरण कोर्टाकडे गेलं असून ते समितीच्या पुढे आहे.’










