Maharashtra Unlock: उद्यापासून 18 जिल्ह्यात लॉकडाऊन नाही: विजय वडेट्टीवार
मुंबई: राज्यात कोरोनाची संख्या हळूहळू कमी लागली आहे. अशावेळी राज्यातील अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी ठाकरे सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. आज (3 जून) आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की, उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता असणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने हा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 5 […]
ADVERTISEMENT
मुंबई: राज्यात कोरोनाची संख्या हळूहळू कमी लागली आहे. अशावेळी राज्यातील अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी ठाकरे सरकारने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. आज (3 जून) आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली की, उद्यापासून 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता असणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने हा निर्णय खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ज्या जिल्ह्यांमध्ये 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट आहे अशा जिल्ह्यातील सर्व निर्बंध आता हटविण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीनंतर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील जिल्ह्यांची आणि महानगरपालिकांची एकूण पाच लेव्हलमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या लेव्हलमध्ये म्हणजे जिथे पॉझिटिव्ही रेट 5 टक्के आहेत किंवा तेथील ऑक्सिजन बेड हे 25 टक्क्यांच्या आत व्यापलेल्या आहेत तिथे कोणत्याही स्वरुपाचा लॉकडाऊन नसेल. म्हणजेच तिथे सर्व व्यवहार हे सुरुळीतपणे चालणार आहेत.
कोणत्या निकषानुसार ठरविण्यात आल्या आहेत पाच लेव्हल
लेव्हल 1 : पहिल्या लेव्हलमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल की, जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा 5 टक्के आहे आणि तेथील ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.
हे वाचलं का?
लेव्हल 2 : दुसऱ्या लेव्हलमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश असेल जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा 5 टक्के असेल आणि ऑक्सिजन बेड हे 25 ते 40 टक्के भरलेले असतील.
लेव्हल 3 : तिसऱ्या लेव्हलमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश असेल जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा 5 ते 10 टक्के असेल आणि ऑक्सिजन बेड हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील
ADVERTISEMENT
लेव्हल 4 : चौथ्या लेव्हलमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश असेल जिथे पॉझिटिव्हिटी रेट हा 10 ते 20 टक्के असेल आणि तिथे ऑक्सिजनचे बेड हे 60 टक्क्यांवर भरलेले असतील.
ADVERTISEMENT
लेव्हल 5 : पाचव्या लेव्हलमध्ये अशा जिल्ह्यांचा समावेश असेल जिथे पॉझिटिव्हीटी रेट हा 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल होणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम?
पहिल्या लेव्हलमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांच्या करण्यात आला आहे समावेश?
1.औरंगाबाद
2. भंडारा
3. बुलडाणा
4. चंद्रपूर
5. धुळे
6. गडचिरोली
7. गोंदिया
8. जळगाव
9.जालना
10. नागपूर
11. लातूर
12. नांदेड
13. नाशिक
14. परभणी
15. ठाणे
16. वर्धा
17. वाशिम
18. यवतमाळ
पहिल्या लेव्हल काय-काय सुरु असणार?
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिल्या लेव्हल जे जिल्हे आहेत तिथे सर्व व्यवहार सुरु राहणार आहेत. शासकीय आणि खासगी कार्यालयं 100 टक्के क्षमतेसह सुरु राहतील. तसेच थिएटर्स जिम, सलून, स्विमिंग पूल यासारख्या गोष्टींना देखील परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रमं आणि लग्न कार्यांना 100 टक्के मुभा असणार आहे. याशिवाय रेस्टॉरंट, मॉल्स गार्डन, वॉकिंग ट्रेक देखील सुरू असतील. तसेच चित्रपट शुटींगलाही परवानगी असेल. पहिल्या लेव्हलमध्ये जमावबंदी देखील नसेल तसेच आंतरजिल्हा प्रवास मुभा राहिल. तर बससेवा ही 100 टक्के क्षमतेने सुरु राहीला.
दुसऱ्या लेव्हलमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांच्या समावेश?
1. मुंबई आणि मुंबई उपनगरे
2. अहमदनगर
3. अमरावती
4. हिंगोली
5. नंदूरबार
महाराष्ट्रात ‘या’ चार टप्प्यात लॉकडाऊन शिथिल होईल
दुसऱ्या लेव्हलमधील जिल्ह्यात काय-काय सुरु असणार?
दुसऱ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांवर काही प्रमाणात बंधनं असतील. इथे खासगी आणि शासकीय कार्यालये सुरु असतील मात्र तिथे 100 टक्के उपस्थिती ठेवता येणार नाही. तसेच इथे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरु असतील. तसेत मॉल, थिएटर हे देखील 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या लेव्हलमध्ये असणाऱ्या जिल्ह्यात लोकल सुरु होणार नाही. सकाळी 5 ते 9 आणि सायंकाळी 5 ते 9 या वेळेत इनडोअर आणि आऊटडोर स्पोर्टस सुरु ठेवण्यास परवानगी असेल.
मुंबईच्या लोकल ट्रेन सुरु होणार?
मुंबईचा समावेश हा दुसऱ्या लेव्हलमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे येथील लोकल सेवा अद्याप तरी सुरु असणार नाही. जर पुढील आठवड्यात मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली तर मुंबईचा समावेश पहिल्या लेव्हलमध्ये होऊ शकतो आणि त्यानंतर मुंबईत लोकल ट्रेन सुरु केल्या जातील अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
लॉकडाऊन लागलं आणि नाट्यगृहं बंद झाली तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू – भरत जाधव
पाहा तिसऱ्या लेव्हलमध्ये किती जिल्ह्यांचा समावेश?
1.अकोला
2.बीड
3. कोल्हापूर
4.उस्मानाबाद
5. पालघर
6. रत्नागिरी
7. सांगली
8. सातारा
9. सिंधदुर्ग
10. सोलापूर
तिसऱ्या लेव्हलमधील जिल्ह्यात काय-काय सुरु असणार?
तिसऱ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने ही सकाळी 7 ते 2 सुरु राहणार आहेत. याशिवाय इतर दुकाने देखील 7 ते 2 सुरु राहतील पण शनिवार आणि रविवार जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन असेल. दरम्यान, आठवड्यातील पहिल्या पाच दिवसात हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी असेल. तर खासगी आणि शासकीय कार्यालये ही 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. या लेव्हलमध्ये असणाऱ्या जिल्ह्यात लग्न सोहळे करता येणार आहे. मात्र, तिथे मर्यादित लोकांची उपस्थितीच असणं गरजेचं आहे. याशिवाय शेतीविषयक जी आवश्यक कामं आहेत ती मात्र पूर्ण क्षमतेने करता येणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्रातील काम देखील सुरु राहणार आहेत. दरम्यान, या जिल्ह्यांमधील मॉल आणि थिएटर मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच येथील लोकल ट्रेन देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी बंदच राहील.
चौथ्या लेव्हलमध्ये फक्त दोन जिल्ह्यांचा समावेश
1. पुणे
2. रायगड
चौथ्या लेव्हलमधील जिल्ह्यात काय-काय सुरु असणार?
चौथ्या लेव्हलमध्ये असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानं ही दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसंच या जिल्ह्यांमध्ये जे लग्न सोहळे होतील त्यासाठी फक्त 25 लोकांनाच उपस्थित राहता येणार आहे. तर अंत्ययात्रेला 20 जणच उपस्थित राहू शकतात. याशिवाय येथील खासगी आणि सरकारी कार्यालये ही फक्त 25 टक्के उपस्थितीतच सुरु ठेवता येणार आहे. येथे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नसेल.
दरम्यान, उर्वरित 10 जिल्ह्यांचा समावेश हा पाचव्या लेव्हलमध्ये करण्यात आला आहे. म्हणजेच हे जिल्हे रेड झोनमधील आहेत. जेथील रुग्णांची टक्केवारी ही अधिक आहे. त्यामुळे जोवर येथील पॉझिटिव्हिटी रेट कमी होणार नाही तोवर या जिल्ह्यांचा पुढील लेव्हलमध्ये समावेश करण्यात येणार नाही.
याशिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन खात्याकडून दर आठवड्याला सर्व जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाहून त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. म्हणजेच उदा. जर एखाद्या जिल्ह्याचा समावेश दुसऱ्या लेव्हलमध्ये असेल आणि मागील आठवड्यात तेथील पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी झाला तर त्या जिल्ह्याचा समावेश हा पहिल्या लेव्हलमध्ये करण्यात येईल.
दरम्यान, राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत ५ टप्पे ठरविण्यात आले असून साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल असे राज्य शासनाने सांगितले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT