गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातील एका युगाचा अस्त आज झाला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच राजकीय क्षेत्र, संगीत क्षेत्र आणि कलाक्षेत्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. लता मंगेशकर यांना मागील 28 दिवसांपासून ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी निधन झालं. मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातील एका युगाचा अस्त आज झाला अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच राजकीय क्षेत्र, संगीत क्षेत्र आणि कलाक्षेत्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त होतो आहे. लता मंगेशकर यांना मागील 28 दिवसांपासून ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाला होता. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
ADVERTISEMENT
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
हे वाचलं का?
केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. महापालिका थोड्या वेळात शिवाजी पार्कात स्टेज उभारणार आहे.
ADVERTISEMENT
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला मध्य प्रदेशमधील इंदोर शहरात एका मराठी कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित दीनानाथ मंगेशकर व आईचे नाव शेवंताबाई होतं. दीनानाथ मंगेशकर स्वतः शास्त्रीय गायक होते. त्यामुळे लता मंगेशकरांना आपल्या वडिलांकडून संगीताचा वारसा लाभला.
ADVERTISEMENT
लहान असतानाच लता मंगेशकर यांनी भावासोबत शास्त्रीय संगीत शिकायला सुरूवात केली. वयाच्या पाचव्या वर्षापासून बहिणी आशा, उषा आणि मीना यांच्यासोबत संगीतसाधनेची सुरूवात केली.
संगीत साधनेच्या जोरावर लता मंगेशकरांनी असंख्य गाणी अजरामर केली. 1942 साली 13 वर्षाच्या असतानाच त्यांनी मराठी चित्रपट ‘किती हसाल’साठी पहिलं गाणं रेकॉर्ड केलं. चित्रपट प्रदर्शित झाला पण नेमकं लता मंगेशकरांनी गायलेलं गाणच चित्रपटातून वगळण्यात आलं. या घटनेमुळे लता मंगेशकर दुःखी झाल्या. त्याच वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचं छत्र हरवलं.
वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी लता मंगेशकर यांच्यावर आली. त्यानंतर लता मंगेशकर यांनी करियरवर लक्ष्य केंद्रीत केलं. त्यानंतर नवयुग चित्रपट कंपनीचे मालक आणि लता मंगेशकर यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक यांनी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी घेतली. याशिवाय लता मंगेशकरांनाही गायन क्षेत्रात मदत केली.
मास्टर विनायक यांनी 1942 साली लता मंगेशकर यांना मराठी चित्रपट ‘पहिली मंगला गौर’मध्ये अभिनय करण्याची संधी दिली. या चित्रपटात त्यांनी एक गाणं देखील गायलं होतं. अशा पद्धतीने मराठी चित्रपटातून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली होती. आज लतादीदी आपल्यातून निघून गेल्या आहेत. मागे उरल्या आहेत त्या फक्त त्यांच्या आठवणी.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT