सातारा : नदीपात्रात ग्रेनेड सापडल्यामुळे खळबळ, ATS कडून तपास सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कराड तालुक्यातील साकुर्डी फाटा येथे तांबवे पुलाजवळ असलेल्या नदीपात्रात ग्रेनेड सापडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती मिळताच कराड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. ATS चे अधिकारीही घटनास्थळावर दाखल झाले असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

सोमवारी सकाळी काही युवक नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी ११ वाजल्याच्या दरम्यान ही बाब समोर आली. युवकांनी नदीपात्रात फेकलेल्या जाळ्यामध्ये सुरुवातीला काहीतरी वस्तू अडकली…यावेळी युवकांना मासा गळाला लागल्यासारखं वाटलं. परंतू गळ बाहेर काढला असता त्यात बॉम्ब सदृष्य गोष्ट अडकलेली दिसली.

हे वाचलं का?

ही वस्तू जड असल्यामुळे संशय आल्यानंतर युवकांनी कराड पोलिसांना याची माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. ATS च्या अधिकाऱ्यांचं एक पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान सापडलेले ग्रेनेड हे सैन्यदलाचे असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून हे ग्रेनेड नदीपात्रात कसे आले याचा तपास सुरु आहे.

Tauktae Cyclone चा साताऱ्यालाही फटका, झाडं कोसळली, घरांचं नुकसान

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT