महाराष्ट्रात लस तुटवडा, मुंबईत लसीकरण तीन दिवस बंद; गुजरातला मिळणार 2 कोटी 50 लाख लसी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात लस तुटवडा भासतो आहे. मुंबईत तर लसीकरण तीन दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे. अशात गुजरातला सिरमचे 2 कोटी डोस तर 50 लाख डोस भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचे मिळणार आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी ही माहिती दिली आहे. एवढंच नाही तर विजय रूपाणी यांनी 18 वर्षे आणि त्यावरील नागरिकांनी पुढच्या पंधरा दिवसात जेव्हा लसी उपलब्ध होतील तेव्हा लसीकरण करून घ्यावं असंही आवाहन केलं आहे. एकीकडे महाराष्ट्राला लसी कधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना गुजरातला मात्र अडीच कोटी लसी दिल्या जाणार आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला लस तुटवडा जाणवत असल्याने १ मे पासून सुरू होणारी लसीकरण मोहीमही सध्या सुरू होणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्रात विशिष्ट टप्पे ठरवून लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही हे पाहून लसीकरण मोहीम सुरू केली जाईल असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात 35 ते 44 या वयोगटाला लसी, त्यानंतर 25 ते 34 हा वयोगट आणि मग 18 ते 24 हा वयोगट असे तीन टप्पे करण्यात येतील, जेणेकरून लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही असाही विचार आम्ही सरकार म्हणून करतो आहोत असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. एकीकडे महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे आणि दुसरीकडे गुजरातला अडीच कोटी डोस मिळणार आहेत.

महाराष्ट्रातल्या मुंबईत तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे कारण लसींचा पुरेसा साठा आलेला नाही. तर दुसरीकडे गुजरातला कोट्यवधी डोस मिळणार आहेत असं सांगण्यात आलं आहे. याआधीही गुजरातला ६ कोटी लोकसंख्या असलेल्या गुजरातला 1 कोटी चार लसी आणि 12 कोटीहून जास्त लोकसंख्या असेलल्या महाराष्ट्राला 1 कोटी 5 लाख लसी असा भेदभाव का करण्यात येतो आहे असा प्रश्न राजेश टोपे यांनी विचारला होता. लसीकरण, रेमडेसिवीर, ऑक्सिजन यावरून राजकारण रंगलेलं पाहण्यास मिळालं. आता पुन्हा एकदा गुजरातला अडीच कोटी लसी उपलब्ध होणार आहेत आणि महाराष्ट्रात अॅक्टिव्ह केसेस जास्त असूनही महाराष्ट्रात लस तुटवडा जाणवतो आहे असं चित्र आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT