मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा तापला! मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना अटक

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मनसेच्या मेळाव्यात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली. ज्या मशिदीतील भोंगे वाजतील, तिथे दुप्पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसा लावायची, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं होतं. त्यानंतर आज मनसेनं घाटकोपरमध्ये भोंगे लावून हनुमान चालीसा लावलीही. या प्रकरणात आता दोन कार्यकर्त्यांना अटक झाली आहे.

ADVERTISEMENT

मराठी नववर्षाच्यानिमित्ताने आयोजित मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला. राज ठाकरे यांनी भोंग्याचा विषय मांडल्यानंतर आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपरमध्ये चक्क झाडावर भोंगे बांधून हनुमान चालीसा वाजवली.

मनसेच्या घाटकोपर येथील कार्यलयाच्या ठिकाणी भोंगे लावण्यात आले होते. दरम्यान, याप्रकरणाची दखल घेत पोलिसांनी मनसेनं लावलेले भोंगे उतरवले आणि साहित्यासह ताब्यात घेतले. त्याचबरोबर या प्रकरणात दोन मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

मशिदीवरील भोंग्यावरुन राज ठाकरे काय म्हणाले होते?

“माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता-आवरता नाकीनऊ येतील, इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.”

ADVERTISEMENT

“अनेक मदरसे असे आहेत की जिथे काय घडतंय, तेच समजत नाही. ही सगळी पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली ही लोकं आहेत. नगरसेवक, आमदार, खासदारांना याच्याशी काही घेणंदेणं नाही. ते कशात लागले, आधार-रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार. त्यांना सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच. एक दिवस असा येईल की त्यावेळी सगळ्यांचे डोळे उघडतील. काय करून ठेवलं म्हणून. एकदा पोलिसांशी बोलून बघा. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. आमचं कुणाचं लक्ष नाही.”

ADVERTISEMENT

“मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आज आणि आता सांगतोय, ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. आमचा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. ज्याप्रकारे स्पीकरचा सकाळ पाच वाजल्यापासून त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. कुठेही लाऊडस्पीकर दिसणार नाही. प्रार्थना घरात करा. प्रत्येकाने आपापला धर्म घरात ठेवला पाहिजे. आमच्याकडं मंदिर आहेत. टाका धाडी. काय मिळणार घंटा. आमच्याकडे काहीच नाही.”

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT