Gujarat: हार्दिक, जिग्नेश, अल्पेश.. गुजरात निवडणुकीत ‘या’ तरुण त्रिकुटाची काय आहे अवस्था?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gujarat Election: गांधीनगर: गुजरात विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत होत आहे. अशा स्थितीत गुजरातमधील तीन तरुण नेत्यांवर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हे तीन नेते म्हणजे हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी. हे तीन उमेदवार कधी काळी भाजपच्या विरोधात उभे ठाकले होते. पण निवडणुकीच्या आधी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोरया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे हे दोघेही नेते भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून जिग्नेश मेवाणी हे रिंगणात आहेत. अशा परिस्थितीत गुजरातमधील हे तीन युवा नेते विधानसभेत पोहचणार की नाही हे पाहावे लागेल. (hardik patel jignesh mevani alpesh thakor know what is condition of seats of gujarats young trio)

ADVERTISEMENT

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल आता हळूहळू जाहीर होत आहेत. ज्यामध्ये भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह अनेक राजकीय पक्षांची विश्वासार्हता पणाला लागली आहे. अशा स्थितीत गुजरातच्या तीन तरुण नेत्यांवर सगळ्यांची नजर आहे. गेल्या निवडणुकीत हे तिन्ही नेते भाजपसाठी आव्हान बनले होते, मात्र यावेळी परिस्थिती बदलली आहे.

यातील अल्पेश आणि हार्दिक हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत, तर जिग्नेश काँग्रेसच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. अशा स्थितीत गुजरातच्या तरुण नेत्यांचे त्रिकूट विधानसभेत पोहोचू शकेल की नाही हे पाहावे लागेल.

हे वाचलं का?

हार्दिक पटेल विधानसभेत पोहोचणार?

गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेलने निवडणुकीपूर्वीच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. हार्दिक पटेल हे त्यांचे मूळ गाव विरमगाम येथून भाजपच्या तिकिटावर रिंगणात आहेत. त्यांचा सामना काँग्रेसचे विद्यमान आमदार लखाभाई भारवाड यांच्याशी आहे.

ADVERTISEMENT

ही काँग्रेसची बलाढ्य जागा मानली जात असून गेल्या दोन निवडणुकांपासून ते सातत्याने विजयी होत आहे. हार्दिक पाटीदार समाजातील आहे, तर लखाभाई भारवाड हे मागासवर्गीय आहेत. अशा स्थितीत येथील लढत प्रचंड निकराची आहे. ज्यामध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

गुजरात विधानसभा निवडणूक 2022 : भाजपने दोन मंत्र्यांची खाती का काढून घेतली?

अल्पेश ठाकोर पुन्हा आमदार होणार?

गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना स्थापन करून दारूविरोधी आंदोलक म्हणून आपली ओळख निर्माण करणारे अल्पेश ठाकोर हे गांधीनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत असून, त्यांचा सामना काँग्रेसचे हिमांशू पटेल आणि आम आदमी पक्षाचे देवेंद्र पटेल यांच्याशी आहे.

2017 मध्ये अल्पेश ठाकोर काँग्रेसच्या तिकिटावर बनासकांठामधील राधनपूर मतदारसंघातून आमदार झाले, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2019 मध्ये राधानपूरमधून पोटनिवडणूक लढवली, पण विजय मिळवता आला नाही. अशा स्थितीत भाजपने अल्पेश यांना गांधीनगर दक्षिणमधून उमेदवारी दिली असून, येथे गेल्या दोन निवडणुकांपासून भाजप सातत्याने विजयी होत आहे.

बिलकिस बानोच्या अपराध्यांना का सोडलं? सुप्रीम कोर्टाची गुजरात आणि मोदी सरकारला नोटीस

जिग्नेश मेवाणी पुन्हा विधानसभेत पोहोचणार?

दुसरीकडे गुजरातमधील दलित राजकारणाचा चेहरा समजले जाणारे जिग्नेश मेवाणी हे काँग्रेसच्या तिकिटावर वडगाम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मेवाणी यांच्यासमोर भाजपने 2012 मध्ये वडगाममधून काँग्रेसमधून विजयी झालेले मणिलाल वाघेला यांना उमेदवारी दिली आहे.

या जागेवर आम आदमी पार्टी आणि एआयएमआयएमचेही उमेदवार आहेत. मेवाणी 2017 मध्ये वडगाम मतदारसंघातून अपक्ष आमदार झाले होते, परंतु त्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.

दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाचा उमेदवार मैदानात उतरल्याने मेवाणी यांच्यासमोर राजकीय आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मेवाणी पुन्हा विधानसभेत पोहोचतात की नाही हे पाहावे लागेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT