क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचं निधन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाताई पाटील यांचं निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर कराड मधील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. आज त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर विटा जवळील हणमंतवडिये या गावात शासकीय इतमामत पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे. हौसाताई पाटील यांनीही आपल्या वडिलांप्रमाणेच स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत अभूतपूर्व कामगिरी केली होती. त्यांच्या पश्चात दोन मुले , एक मुलगी , सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

ADVERTISEMENT

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही हौसा पाटील समाजातील वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी झटत राहिल्या. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून हौसाताई पाटील काही काळ समाजकारण व राजकारणातही सहभाग घेतला. पुरोगामी चळवळीच्या आधारस्तंभ म्हणून हौसाताई पाटील यांची ओळख होती. सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहत होत्या.

इंग्रंजांविरुद्ध लढ्यातही हौसा पाटील होत्या आघाडीवर –

हे वाचलं का?

पत्री सरकारला आवश्यक असणारा शस्त्रपुरवठा करण्याचं काम तरुण काळात हौसाताई करत असत. इंग्रजांनी ठिकठिकाणी उभारलेले डाक बंगले जाळणं असो, रेल्वेचे रूळ उखाड्णं असो, फोनच्या तारा तोडणं असो वा इंग्रजांचा खजिना लुटणं असो, या सर्वच गोष्टीमध्ये हौसाताई आघाडीवर असायच्या. सुरलीच्या घाटात ब्रिटीशांच्या गाडीवरती छापा असो किंवा वांगी या ठिकाणचा ब्रिटिशांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी त्यांनी आपला जीव धोक्यात घातललेल्या घटना असो. भवानीनगर रेल्वे स्थानकावरती तर इंग्रजांचा शस्त्रसाठा लुटण्यासाठी वेषांतर करून हौसाताईंनी योजना आखली आणि ती योजना त्यांनी यशस्वी करून दाखविली होती.

क्रांतीसिंह नाना पाटलांची एकुलती एका मुलगी असलेल्या हौसाबाई 3 वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील आईचं छत्र हरवलं. स्वातंत्र्य लढ्यासाठी वडील भूमिगत राहत असल्यामुळे हौसाबाई अत्यंत खडतर परिस्थितीत जीवन जगावं लागलं. मात्र देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. पुढे प्रतिसरकारच्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिलं. इंग्रजांच्या नजरा चुकवून भूमिगत अ‍सलेल्या कार्यकर्त्यांना निरोप पोहोचवणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, पत्रीसरकारला लागणाऱ्या हत्यारांची ने-आण करणे, अशी कामं त्यांनी केली.

ADVERTISEMENT

स्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT