महाराष्ट्रातल्या सातारा-सोलापूरमध्ये Corona चा कहर, 11 जिल्ह्यांमध्ये दिलासादायक स्थिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रातल्या सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढत आहेत. तर महाराष्ट्रातले 11 जिल्हे असे आहेत जिथे कोरोना रूग्ण कमी होत आहेत. केंद्र सरकारने जो देशाचा कोव्हिड अहवाल सादर केला आहे त्यामध्ये ही माहिती दिली आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. सगळ्या नागरिकांनी पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केलं आहे. सोलापूरमध्येही अशीच स्थिती आहे.

ADVERTISEMENT

Lockdown: कोरोना रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा एकमेव उपाय: राहुल गांधी

केंद्र सरकारच्या अहवालात काय म्हटलं आहे?

हे वाचलं का?

मागील ती आठवड्यांच्या कालावाधीत सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्ण वाढले आहेत. साताऱ्यात 13 ते 19 एप्रिल या कालावधीत या ठिकाणी 8 हजार 958 अॅक्टिव्ह रूग्ण होते. 20 ते 26 एप्रिल या कालावधीत रूग्णसंख्या 12 हजार 914 वर पोहचली. तर 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत ही रूग्णसंख्या 15 हजार 328 इतकी झाली.

सोलापूरमध्ये 13 ते 19 एप्रिल या कालावधीत 8 हजार 863 अॅक्टिव्ह रूग्ण होते. 20 ते 26 एप्रिल या कालावधीत ही संख्या 11 हजार 401 वर पोहचली. तर 27 एप्रिल ते 3 मे या कालावधीत ही संख्या 13 हजार 864 वर पोहचली.

ADVERTISEMENT

देशातल्या एकूण 30 जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत मागील तीन आठवड्यांमध्ये वाढ होते आहे असंही केंद्र सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांना लसीकरण ही घोषणा मोदी सरकारने तयारीशिवायच केली?

महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्ये कमी झाले कोरोना रूग्ण

मुंबई, पुणे, ठाणे, लातूर, औरंगाबाद, भंडारा, मुंबई उपनगर, नांदेड, गोंदिया, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी कोरोना रूग्णांमध्ये मागील 3 आठवड्यांमध्ये घट दिसून आल्याचं केंद्र सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

देशभरात कोरोनाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. 1 लाखापेक्षा जास्त अॅक्टिव्ह केसेस असलेली 12 राज्यं आहेत. 50 हजार ls 1 लाख या दरम्यान अॅक्टिव्ह रूग्णसंख्या असलेली सात राज्यं आहेत. तर 17 राज्यं अशी आहेत जिथे 50 हजारांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत.

टेस्ट पॉझिटिव्हिटी रेटबाबत काय म्हटलं आहे?

पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट असलेली फक्त तीन राज्यं देशभरात आहेत.

पाच ते 15 टक्के पॉझिटिव्हिटी रेट असलेली 10 राज्य आहेत. तर 15 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट असलेली 24 राज्यं आहेत. यावरूनच कोरोनााने किती भयंकर रूप धारण केलं आहे ते दिसून येतं आहे.

Record! महाराष्ट्रात एका दिवसात 5 लाखांपेक्षा जास्त लोकांचं लसीकरण

देशात लसीकरण किती झालं आहे? (5 मेपर्यंत समोर आलेली संख्या)

45 वर्षे आणि त्यावरील लोकांना देण्यात आलेल्या लसी

पहिला डोस- 10.63 कोटी

दुसरा डोस- 1.68 कोटी

एकूण – 12.31 कोटी

हेल्थकेअर वर्कर्स

पहिला डोस- 95 लाख

दुसरा डोस – 63 लाख

एकूण – 1.58 कोटी

फ्रंटलाईन वर्कर्स

पहिला डोस – 1.36 कोटी

दुसरा डोस- 73 लाख

एकूण 2.9 कोटी

18 ते 44 वयोगट

6.71 लाख

दुसरा डोस-०

एकूण- 6.71 लाख

देशभरातलं एकूण लसीकरण

पहिला डोस- 13.1 कोटी

दुसरा डोस- 3.4 कोटी

एकूण – 16.5 कोटी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT