संयम दाखवा तुम्हालाही भविष्यात संधी मिळेल – बाळासाहेब थोरातांचा वडेट्टीवारांना टोला
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन सध्या राज्यातलं वातावरण पेटलं आहे. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची एक मंथन बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यामुळे मला महसुल मंत्रीपद मिळालं नाही असं वक्तव्य केलं. वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला आहे. “काँग्रेस जातीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. […]
ADVERTISEMENT
ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरुन सध्या राज्यातलं वातावरण पेटलं आहे. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यात राज्यातील सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांची एक मंथन बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मी ओबीसी असल्यामुळे मला महसुल मंत्रीपद मिळालं नाही असं वक्तव्य केलं. वडेट्टीवारांच्या या वक्तव्याचा राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
“काँग्रेस जातीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. काँग्रेस पक्षानेच वसंतराव नाईकांना मुख्यमंत्री केलं. बॅरिस्टर ए.आर. अंतुलेंना मुख्यमंत्री करणारा पक्ष सुद्धा काँग्रेसच होता. वडेट्टीवारांचं वय पाहता भविष्यात त्यांना नक्कीच मोठी संधी मिळेल फक्त त्यासाठी त्यांनी संयम दाखवावा.” बाळासाहेब थोरात मुंबईत एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते.
लोणावळ्यातील कार्यक्रमात वडेट्टीवारांनी वाघ हा आमच्या इशाऱ्यावर चालतो असं म्हणज शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. याबद्दल विचारलं असता बाळासाहेब थोरातांनी त्यांची पाठराखण केली. “वडेट्टीवार आणि वाघाचं जुनं नातं आहे. ताडोबा त्यांच्या मतदारसंघापासून जवळ आहे. शिवसेनेला यात वाईट वाटण्याची गरज नाही आमची आघाडी ही मजबूत आहे आणि हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.” याचसोबत विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडेल अशी माहिती थोरात यांनी दिली.
हे वाचलं का?
Maratha Reservation : ‘जोशी-फडणवीसांनी काम केलं, इच्छाशक्ती असेल तर बाकीचेही करतील’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT