महाराष्ट्रात पुन्हा Lockdown लागणार का? राजेश टोपे म्हणतात…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण राज्यात वाढत आहेत. कोरोना हा मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे मात्र रूग्ण बरे होण्याचंही प्रमाण वाढलं आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? यावर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे. मुंबई असो किंवा राज्यात असो लोकांनी शिस्त पाळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच जे लोक नियम पाळत नाहीत तिथे लोकांना दंड भरावा लागतो आहे. स्वयंशिस्त पाळली तर अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकेल. लोकांनी गर्दी करणं टाळलं पाहिजे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सोशल डिस्टन्सिंग प्रत्येकाने पाळलंच पाहिजे तसंच मास्क हा प्रत्येकाने लावणं अनिवार्य केलं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. लोकांनी स्वयंशिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं. ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग या तीन सूत्रांवर काम सुरू आहे. सर्व सामाजिक आणि शासकीय कामांना निर्बंध घातले आहेत. काही ठिकाणी नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन आहे. मात्र लॉकडाऊन हा पर्याय नाही असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं.

लॉकडाऊनबाबत काय म्हणाले आहेत राजेश टोपे?

हे वाचलं का?

लॉकडाऊन लावण्याची सरकारची इच्छा नाही. लॉकडाऊन आम्ही करणार नाही पण आम्ही सातत्याने हे सांगतो आहोत की कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका. लोकांनी मास्क लावावा, सुरक्षित अंतर ठेवावं आणि

ADVERTISEMENT

राज्यात मृत्यूदर कमी झाला आहे मात्र प्रसार वाढला आहे. सुमारे ८५ टक्के लोक लक्षणं न दिसणारे आहेत. बरेच लोक राज्यात होम क्वारंटाईन आहेत. हॉस्पिटल्स किंवा कोव्हिड सेंटरमध्ये बेड्स उपलब्ध आहेत. आपल्याला या सगळ्या पार्श्वभूमीवर लसीकरण वाढवावं लागेल. त्यामुळे रोज आपण १ ते सव्वा लाख लोकांना लस दिली आहे. आत्तापर्यंत आपण ३० लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली आहे अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT