आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असून लसीकरण मोहीमेला वेग देण्यात येतोय. अनेक नेतेमंडळी तसंच कलाकारांनी आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. तर आज महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतलाय.

ADVERTISEMENT

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याचप्रमाणे नागरिकांनाही लस घेण्यासाठी आवाहन केलं आहे. ते म्हणाले, “आज मी मुंबईच्या जे.जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन मी आपणास करतो. मी लस घेतली आपणही घ्या!”

कोरोना, काळजी आणि लसीकरण तुमच्या मनातल्या प्रश्नांना डॉ. रवि गोडसेंनी दिली आहेत उत्तरं

हे वाचलं का?

तर नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याचं स्पष्ट केलंय. मोदी सरकारने ही अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. भारतातील जास्तीत लोकांना लस देण्यात यावी यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता देशात 1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे.

‘BIG News 1 मे पासून 18 वर्षांवरील सगळ्यांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार’

ADVERTISEMENT

आत्तापर्यंत 12 कोटी लोकांना देशभरात लस देऊन झाली आहे. 1 एप्रिलपासून 45 वर्षे आणि त्यावरील लोकांना लस देण्यास सुरूवात झाली होती. त्यानंतर तरूण वर्गालाही लस देण्यात यावी अशीही मागणी होत होती. तसंच राज्यांना व्हॅक्सिन तयार करणाऱ्या कंपन्यांकडून 50 टक्के कोटा राज्यांना थेट घेता येणार आहे असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण झालं पाहिजे असंही मोदी सरकारने म्हटलंय.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT