मुंबईकरांनो सांभाळा, हवामान विभागाकडून शहरात अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं. ‘आरे’मधली ८१२ एकरची जागा वन विभागाच्या ताब्यात, मुंबईच्या मध्यभागी जंगल उभं राहणार सकाळच्या वेळेतही मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु […]
ADVERTISEMENT
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील ४ दिवसांमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा प्रत्यय मुंबईत पहायला मिळाला. सोमवारी रात्रीपासून मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ज्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र पहायला मिळालं.
ADVERTISEMENT
‘आरे’मधली ८१२ एकरची जागा वन विभागाच्या ताब्यात, मुंबईच्या मध्यभागी जंगल उभं राहणार
सकाळच्या वेळेतही मुंबईतील अनेक भागांमध्ये पाऊस सुरु होता. दादर, वरळी, वांद्रे, अंधेरी, चेंबूर, कुर्ला, सायन या भागात सकाळपासून पावसाची संततधार सुरु होती. ज्यामुळे सायन भागात पाणी साचलेलं पहायला मिळालं. षण्मुखानंद हॉल परिसरात पाणी साचल्यामुळे या भागातील वाहतूकही धीम्या गतीने जात होती. दरम्यान शहरातील रस्त्यांवर पाणी साचू नये यासाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली असून जागोजागी पंप लावून पाण्याचा निचरा होण्याचे प्रयत्न केले जात होते.
हे वाचलं का?
दरम्यान या चार दिवसांच्या काळात हवामान विभागाने आपत्ती व पुनर्वसन विभागाला सर्व संबंधित जिल्हा यंत्रणांशी संपर्क साधून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही धोकादायक इमारती, दरड क्षेत्रात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईच्या हिंदमाता परिसरात नेहमी पावसात पाणी साचल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण होते. मात्र यंदा पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
याव्यतिरीक्त सध्या मुंबईत अनेक विकासकामं सुरु आहेत. या पावसाचा विकासकामांवर परिणाम होणार नाही तसेच झाडं कोसळून, मॅनहोल उघडी राहून होऊ शकणाऱ्या अपघातांचा मुद्दा लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना आधीच करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. याव्यतिरीक्त इतर जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज राहण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT