लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नांची ही आहेत उत्तर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: व्हॅक्सिनच्या माध्यमातून कोव्हिड विरोधातील लढाई लढण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. महाराष्ट्रात देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक व्हॅक्सिनेशन झालं आहे. पण सध्या महाराष्ट्रात लसीकरणासंदर्भात बराच घोळ सुरू आहे. याबाबत लोकांच्या मनात प्रश्न आहेत. ‘मुंबई तक’ला यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वाचक आणि प्रेक्षक प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नांची उत्तरं आम्ही राज्याच्या व्हॅक्सिनेशन मोहिमेचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांच्याकडून मिळवून तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत.

ADVERTISEMENT

1. राज्यात लसीकरण सुरू आहे का ?

हो राज्यातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या डोसनुसार राज्यात लसीकरण सुरू आहे. राज्यात 2 कोटी 4 लाख 99 हजार 346 व्यक्तींचं व्हॅक्सिनेशन सध्या झालं आहे.

हे वाचलं का?

2. राज्यात सध्या लसीचे किती डोस शिल्लक आहेत?

राज्यात सध्या लसीचे 2.3 लाख डोस शिल्ल आहेत

ADVERTISEMENT

3. राज्यात सध्या दुसरा डोस देण्यात येतोय का?

ADVERTISEMENT

हो राज्यात सध्या कोव्हिशिल्ड लसीचा दुसरा डोस प्राधान्याने देण्यात येतो. लस उरली की पहिला डोस घेणाऱ्या व्यक्तींना तो देण्यात येतो. कोव्हॅक्सिन लसीची उपलब्धता कमी असल्यामुळे सध्या दुसरा डोस घेणाऱ्यांनाच तो डोस देण्यात येतो आहे. कोव्हॅक्सिन लसीचे सध्या 4.5 लाख लोकांना दुसरा डोस देणं बाकी आहे.

4. दुसरा डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं का?

नाही. पहिल्या डोस वेळी रजिस्ट्रेशन झालेलं असेल तेव्हा दुसऱ्या डोससाठी फक्त स्लॉट बुकींग करायचं .

‘स्टॉक लक्षात न घेताच सरकारने लसीकरणाबाबत घोषणा केल्या’, Serum च्या वरिष्ठ संचालकाचं अत्यंत मोठं वक्तव्य

5. 18 ते 44 वर्षांच्या व्यक्तींचं व्हॅक्सिनेशनबाबत नेमकी माहिती काय?

18 ते 44 वर्षांच्या व्यक्तींचं व्हॅक्सिनेशन स्थगित आहे. पुढील आदेशापर्यंत ते बंद राहणार आहे. राज्य सरकारने या वयोगटातील व्यक्तींना लस देणं सध्या बंद केलं आहे. 18 ते 44 महाराष्ट्र सरकार विकत घेतं. त्यामुळे हा निर्णय सरकारने घेतला आहे. पैसे आहेत पण डोस उपलब्ध नाहीत. आपण 1 करोड डोसची परवानगी दिली आहे. गुरुवारी मुंबई, रायगड, ठाणे या भागांमध्ये या वयोगटातल्या सुमारे 7 हजार व्यक्तींना डोस देण्यात आला आहे.

6. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं का?

दुसऱ्या डोससाठी ऑनलाईन आणि ऑनसाईट असे डोस देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. याबाबत गोंधळ कमी करण्यासाठी सेंटरवर दोन रांगा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. केंद्रांना तेवढी मुभा देण्यात आली आहे. रांगेतच डोस घ्यावे लागणार आहेत.

7. 45 वयाच्या वरील व्यक्तींना कितवा डोस देत आहोत?

45 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येतो आहे.

थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

8. दुसरा डोस कुठे घ्यायचा?

भारतात कुठेही तुम्ही दुसरा डोस घेऊ शकता. मोबाईल नंबर आणि आधार कार्ड क्रमांक पहिल्या डोसच्या रजिस्ट्रेशनवेळी नोंद करण्यात आल्याने फक्त लसीचं बुकींग एवढाच भाग शिल्लक राहतो.

9. स्पुटनिक लस महाराष्ट्रात देतात का?

नाही सध्या तरी ही लस महाराष्ट्रात देत नाही. केंद्र सरकराच्य सूचना नाहीत तशा. रेड्डी लेबॉरेटरीने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात स्पुटनिकची लस भारतात आणि महाराष्ट्रात देण्यात येईल.

10. कोव्हिड झाल्यानंतर केव्हा लस घ्यावी?

कोव्हिड बरा झाल्यानंतर 3 महिन्यांनंतर लस घ्यावी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT