हे आहेत 2GB Daily Data सह Airtel चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन
Airtel आपल्या प्रीपेड ग्राहकांना विविध प्लान्स ऑफर करत आहे. हे प्लान्स वेगवेगळी व्हॅलिडिटी आणि बेनिफिट्ससोबत आहेत. जर तुम्ही एअरटेलचे प्रीपेड ग्राहक असाल आणि 2 GB डेटासह डेली प्लॅन घेण्याचाविचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 2 GB डेली डेटाचे बेस्ट प्लॅनचे काही ऑप्शन्स सांगणार आहोत. 698 रुपयांचा प्लॅन एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2GB डेटा, अनलिमिटेड […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Airtel आपल्या प्रीपेड ग्राहकांना विविध प्लान्स ऑफर करत आहे. हे प्लान्स वेगवेगळी व्हॅलिडिटी आणि बेनिफिट्ससोबत आहेत. जर तुम्ही एअरटेलचे प्रीपेड ग्राहक असाल आणि 2 GB डेटासह डेली प्लॅन घेण्याचाविचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एअरटेलच्या 2 GB डेली डेटाचे बेस्ट प्लॅनचे काही ऑप्शन्स सांगणार आहोत.
हे वाचलं का?
698 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल, 84 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 100SMS मिळणार आहेत. तसेच, या प्लॅनमध्ये ग्राहकांना Amazon प्राइम मोबाईल एडिशनचे 30 दिवसांचे फ्री ट्रायल, 3 महिन्यांसाठी Apollo 24|7 Circle,एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम सबस्क्रिप्शन, फ्री हॅलो ट्यून्स, फ्री विंक म्युझिक, 1 वर्षासाठी मोफत ऑनलाईन कोर्स मिळतील आणि FASTag वर 100 कॅशबॅक दिलं जातो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
449 रुपयांचा प्लान
एअरटेलचा या प्रीपेड प्लानमध्ये 56 दिवसांच्या व्हॅलिडिटी आहे. या दरम्यान डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100SMS दिले जातात. या प्लॅनमध्ये, बाकीचे फायदे 698 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे दिले जातात.
298 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल, डेली 2GB डेटा आणि दररोज 100SMS दिले जातात. हा प्लान 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह असणार आहे. यामध्ये, वरील दोन्ही प्लॅन्सप्रमाणेच उर्वरित फायदे उपलब्ध असणार आहेत.
2498 रुपयांचा प्लान
हा एअरटेलची एक लाँग टर्म प्लॅन आहे. हा प्लान वर्षभरासाठी म्हणजे 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह आहे. यामध्ये ग्राहकांना डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि 100SMS दररोज मिळतात. यासह, उर्वरित फायदे 698 रुपयांच्या प्लॅनप्रमाणे उपलब्ध आहेत.
599 रुपयांचा प्लान
कंपनीचा हा प्लान 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या दरम्यान, ग्राहकांना डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि 100SMS दिले जातात. हा प्लॅन्स इतर प्लॅन्सप्रमाणेच लाभ देतो. तसेच, Disney+ Hotstar VIP चा देखील एका वर्षासाठी अॅक्सेस दिला जातो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT