राज्यात आता Home Quarantine बंद, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात अक्षरश: हाहाकार उडवला. अशावेळी आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने (Maharashtra Government) एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे महाराष्ट्रात होम आयसोलेशन (Home Isolation) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे तिथे होम आयसोलेशन हे 100 टक्के बंद करण्यात आलं आहे. याबाबतचा निर्णय आज (25 मे) राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जाहीर केला आहे.

या निर्णयाचा असा अर्थ आहे की, आता यापुढे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आणि त्याला जरी लक्षणं नसली तरीही त्याला कोव्हिड केअर सेंटरमध्येच राहावं लागणार आहे.

Mucor mycosis मुळे महाराष्ट्रात 90 मृत्यू, पुढचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे-राजेश टोपे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे नेमकं काय म्हणाले:

‘आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यापेक्षा जास्त आहे सरासरीपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या बैठकीत दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन हे 100 टक्के बंद करा आणि CCC वाढवा. म्हणजे कोव्हिड केअर सेंटर वाढवा. सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट करा.’ असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

‘दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गावागावांमध्ये कोव्हिड केअर सेंटर वाढविण्याचे निर्देश हे केंद्र सरकारनेसुद्धा दिलेल्या आहेत. म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा १५व्या वित्त आयोगाची जो निधी ग्रामीण ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध आहे त्यातून २५ टक्के खर्च हा कोव्हिड केअर सेंटर उभा करण्यासाठी म्हणजे २५ ते ३० बेड निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. ही महत्त्वाची सूचना या निमित्ताने देण्यात आली आहे.’ असं राजेश टोपे म्हणाले.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात Lockdown वाढणार, 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण तूर्तास स्थगित-राजेश टोपे

पाहा यापुढे कोणकोणत्या जिल्ह्यात होम आयसोलेशन बंद असणार?

कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये आता होम आयसोलेशन पूर्ण बंद करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळावा म्हणून केंद्र सरकारचे पाय धरायलाही तयार -राजेश टोपे

राज्यातील कोरोनाची सध्याची आकडेवारी काय?

महाराष्ट्रात दिवसभरात 43 हजार 320 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 51 लाख 82 हजार 592 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 92.51 टक्के झाला आहे. तर दिवसभरात 22 हजार 122 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. दिवसभरात 361 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर हा1.59 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 32 लाख 77 हजार 290 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 56 लाख 2 हजार 19 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज घडीला 27 लाख 29 हजार 301 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 24 हजार 932 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात 3 लाख 27 हजार 580 सक्रिय रूग्ण आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT