शेतीसाठी होणार होमिओपॅथी औषधांचा वापर, बारामती कृषी विज्ञान केंद्रात अनोखा प्रयोग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– वसंत मोरे, बारामती प्रतिनिधी

ADVERTISEMENT

होमिओपॅथी औषधांचा वापर हा माणसांवर उपचारासाठी केला जातो. परंतु जर तुम्हाला कुणी असं सांगितलं की, होमिओपॅथी औषधांचा वापर हा आता शेतीसाठी केला जातोय तर आपल्याला विश्वास बसेल का? बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात स्कॉच बोनेट या मिरचीच्या वाणाची लागवड करण्यात आली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे मिरची वरील किड, रोग नियंत्रित करण्यासाठी निव्वळ होमिओपॅथी औषधांचा वापर करण्यात आलाय. हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे.

मिरची म्हटलं की आपल्याला आठवतो तो तिचा तिखटपणा. परंतु ही मिरची खायला गोड लागते. याच मिरचीवर फवारणीसाठी आणि तिच्या वाढीसाठी संपुर्ण होमिओपॅथीची औषधं फवारणी करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या मिरचीचा उत्पादन खर्च हा रासायनिक खतांच्या तुलनेत ३ पट कमी आहे.

हे वाचलं का?

आतापर्यंत तुम्ही रासायनिक, जैविक, सेंद्रिय, एकात्मिक शेती असे वेगवेगळे प्रयोग पाहिले असतील. आता चक्क होमिओपॅथीक शेतीचा प्रयोग बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात यशस्वी करुन दाखवला आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच बारामतीत नेदरलंडच्या स्कॉच बोनेट या जातीची गोड मिरची व ढोबळी मिरची होमिओपॅथी औषधावर यशस्वीरित्या उत्पादित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

निवृत्त लष्करी अधिकाऱ्यासाठी स्विगी बॉय ठरला देवदूत, ट्रॅफिकमध्ये दुचाकीवरुन पोहचवलं रुग्णालयात

ADVERTISEMENT

यासंदर्भात कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ संतोष करंजे यांनी सांगितले की, “कर्नाटकातील होमिओपॅथिक तज्ञ डॉ. विरेंद्र पाटील यांनी संशोधित केलेल्या होमिओपॅथिक औषधी उपचार पद्धतीतून हे मिरचीचे पीक घेण्यात आले आहे. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात पिकवण्यात आलेली विविध रंगाची मिरची सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यातही अत्यंत कमी खर्चात ही मिरची उत्पादीत करण्यात आली आहे. तसेच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून त्यावर नायलॉन पेपर टाकण्यात आलाय. ज्याचा खर्च शेडनेट किंवा पॉलिहाऊस पेक्षा खूप कमी आहे.

होमिओपॅथी औषधावर आधारीत तंत्रज्ञानाद्वारे केवळ वीस हजार रुपयात एका एकर मिरचीचे उत्पादन यशस्वीरित्या घेता येऊ शकते. ९ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. याच दरम्यान होमिओपॅथीसह विविध प्रयोग शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये पाहायला मिळणार आहेत.

या संदर्भात डॉ. विरेंद्र पाटिल यांनी सांगितले की, “आजपर्यंत होमिओपॅथिक औषधांचा माणसांसावर उपचारासाठी वापर केला जात आहे. होमिओपॅथीचा पिकांसाठी वापर करण्याची संकल्पना पहिल्यांदा पुढे आली. त्यातून बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने मिरचीवर हा प्रयोग करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे होमिओपॅथी औषधांचा वापर करून पिकांवरील कीड रोग नियंत्रित करण्यात यश मिळाले आहे. सध्या वेगवेगळ्या रंगातील लगडलेली मिरची याचा प्रत्यय देत आहे. याच होमिओपॅथी तंत्रज्ञानाचा वापर सर्वच पिकांवर होऊ होतो”, असंही डॉक्टर पाटील यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT