सर्व महत्वाच्या केसेस वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी मुंब्रा येखील खाडीत सापडला. या घटनेनंतर विधानसभेत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका करत…या प्रकरणात मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यानंतर मनसेनेही आता शिवसेनेवर निशाणा साधत सर्व महत्वाच्या केसेस या सचिन वाझेंकडेच कशा सोपवल्या जातात असा प्रश्न विचारला आहे.

ADVERTISEMENT

मनसुख हिरेन प्रकरणात पोस्ट मार्टम पूर्ण, ठाणे पोलीस म्हणतात…

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रश्न विचारला आहे. २००८ साली सचिन वाझे यांनी शिवसेनेच प्रवेश केला होता. शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजु होतात, त्यामुळे या प्रकरणातले गुढ वाढले आहे असं म्हणत देशपांडे यांनी सचिन वाझेंच्या सहभागावरुन शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे.

हे वाचलं का?

दरम्यान मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ आणि याप्रकरणी सचिन वाझेंचा सहभाग यावरुन विधानसभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. स्कॉर्पिओ कार जेव्हा अँटेलियाबाहेर सापडली तेव्हा सर्वात आधी तिथे सचिन वाझे कसे पोहचले? स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास सचिन वाझेंकडेच का देण्यात आला? स्कॉर्पिओचा मालक क्रॉफर्ड मार्केटमध्ये कुणाला भेटला होता? हे आणि असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. ज्यानंतर दोन तासातच स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत सापडल्याची बातमी समोर आली. या प्रकरणात अनेक योगायोग कसे ? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सचिन वाझेंवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत खडाजंगी

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT