देशसेवेसाठी तयार होताना ! पाहा, कसं होतं BSF जवानांचं ट्रेनिंग…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगभरात चिंतेचं वातावरण आहे.

हे वाचलं का?

भारतालाही या युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसलेला असून युक्रेनमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याच्या प्रक्रीयेत एका विद्यार्थ्याला आपले प्राण गमवावे लागले असून काही विद्यार्थी लष्करी कारवाईत जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताने सावध भूमिका घेतलेली असली तरीही अशा खडतर प्रसंगामध्ये प्रत्येक देशाला आपली युद्धसज्जता तपासावी लागते.

ADVERTISEMENT

श्रीनगरमध्ये सध्या BSF म्हणजे सीमा सुरक्षा दलाच्या नवीन जवानांचं ट्रेनिंग सुरु आहे. ज्यात या नवीन जवानांना खडतर परिस्थितीत स्वतःला सिद्ध करावं लागत आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे भारतीय संरक्षण दलातलं असं एक पथक आहे की ज्यात युद्धजन्य परिस्थितीत लढणारे जवान, अत्याधुनिक लढाऊ विमानं आणि अद्ययावत रणगाडे आणि शस्त्रास्त्र पहायला मिळतात.

भारतीय सीमेच्या सुरक्षेची मुख्य जबाबदारी या पथकाकडे असते. ट्रेनिंगदरम्यान अशा अनेक खडतर परिस्थितीतून या जवानांना जावं लागतं.

सध्या BSF च्या या ट्रेनिंग कँपमध्ये ७०० पेक्षा जास्त नवोदीत आणि युवा जवान प्रशिक्षण घेत आहेत.

जगातली सध्याची परिस्थिती पाहता कोणताही देश हा आपल्या सीमेच्या रक्षणासाठी हलगर्जीपणा करु शकत नाही. यासाठी BSF जवानांना कठोरातील कठोर परिस्थितीचा सामना करता यावा यासाठी त्यांना तयार केलं जात असल्याचं BSF च्या काश्मीर विभागाचे IG राजा बाबू सिंग यांनी सांगितलं.

या ट्रेनिंगमध्ये जवानांना अत्याधुनिक शस्त्रांत्रांचा वापर, युद्धतिनी, अँटी ड्रोन टेक्नोलॉजीचे धडे दिले जातात.

भारतीय सीमेवर अतिरेकी किंवा दुसऱ्या देशातील सैन्याने केलेला घुसखोरीचा प्रयत्न, स्मगलिंग, लष्करी कारवाई आणि इतर परिस्थितीचा सामना BSF ला करायचा असतो.

भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून होणारे हल्ले आणि दोन्ही देशांमधला युद्धाचा इतिहास पाहिला तर BSF च्या जवानांना डोळ्यात तेल घालून सज्ज ठेवावं लागतं.

BSF चे जवान भारत आणि पाकिस्तानच्या सीमेचं याचसोबत भारत-बांगलादेशच्या सीमेचं रक्षण करतात. या दोन्ही शेजारी राष्ट्रांच्या ६ हजार ३०० किलोमीटर सीमेचा भाग BSF जवानांच्या निगराणीखाली असतो.

पाकिस्तानकडून वारंवार होणारे अतिरेकी हल्ले, बांगलादेशमधून अवैधरित्या मनुष्य आणि प्राण्यांची तस्करी या दोन प्रमुख मुद्द्यांमुळे BSF जवानांचं सीमेरचं काम अतिशय महत्वाचं मानलं जातं.

भविष्यातल्या खडतर परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा जवान आताच स्वतःला सज्ज करतो आहे.

देशसेवेचं व्रत घेऊन रणांगणात उतरलेल्या या जवानांमुळे कोट्यवधी भारतीय जनता रात्री निवांत झोपू शकते.

अनेकदा देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना या जवानांना आपले प्राण अर्पण करावे लागतात.

तरीही कर्तव्यात कोणतीही कसूर न करता या देशातली तरुण पिढी हे जोखमीचं काम अत्यंत जिगरबाज पद्धतीने करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT