कशी आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती? डॉक्टरांनी दिली माहिती
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी आता डॉक्टरांनी पुन्हा माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना अद्यापही ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. त्याचप्रमाणे त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाचीही […]
ADVERTISEMENT
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी आता डॉक्टरांनी पुन्हा माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लता मंगेशकर यांना अद्यापही ICU मध्येच ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करते आहे. त्याचप्रमाणे त्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. त्यांना निमोनिया झाल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना कोरोनाचीही लक्षणं जाणवू लागली त्यामुळे त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे.
ADVERTISEMENT
8 जानेवारीपासून लता मंगेशकर यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आम्ही त्यांची प्रकृती सुधारावी असं यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहोत असं डॉ. प्रतीत समदानी यांनी सांगितलं आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांचे चाहतेही प्रार्थना करत आहेत. त्यांना लवकरच बरं वाटेल आणि त्या घरी परततील असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
लता मंगेशकर यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मात्र त्यांचं वय 92 असल्याने त्यांच्या प्रकृतीच्या बाबतीत काळजीचा भाग म्हणून ब्रीच कँडी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ब्रीच कँडी रूग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ANI ला हे सांगितलं आहे की, ‘लता मंगेशकर यांच्यावर अजूनही आयसीयूमध्येच उपचार सुरू आहेत. आम्ही कसोशीचे प्रयत्न करून त्यांना बरं करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यांचीच ही इच्छा आहे की लता मंगेशकर यांना लवकर बरं वाटलं पाहिजे. अनेक चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत काही प्रमाणात सुधारणा होते आहे.’ डॉ. प्रतीत समदानी यांनी हेदेखील सांगितली की लता मंगेशकर यांना असं वाटतं की त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती किंवा त्याविषयीची चर्चा फार होऊ नये.
ADVERTISEMENT
2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी
2019 मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT