5G चा खर्च किती होणार? मुकेश अंबानींनी सांगितलेला जिओचा प्लान स्वस्त की महाग?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतात 5G सेवा सुरू केली आहे. यासोबतच आजपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे. आजपासून देशातील सर्व शहरांमध्ये 5G उपलब्ध नसले तरी पुढील वर्षाच्या अखेरीस ही सेवा पॅन इंडियाच्या पातळीवर नेली जाईल. म्हणजेच देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील हा प्रश्न आहे.कोणत्याही […]
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतात 5G सेवा सुरू केली आहे. यासोबतच आजपासून अनेक शहरांमध्ये 5G सेवा उपलब्ध होणार आहे. आजपासून देशातील सर्व शहरांमध्ये 5G उपलब्ध नसले तरी पुढील वर्षाच्या अखेरीस ही सेवा पॅन इंडियाच्या पातळीवर नेली जाईल. म्हणजेच देशाच्या कानाकोपऱ्यात 5G सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील हा प्रश्न आहे.कोणत्याही कंपनीने आपल्या 5G डेटा किंवा 5G रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती दिलेली नाही. मात्र, रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, जिओ भारतात स्वस्त 5जी सेवा आणणार आहे.
ADVERTISEMENT
परवडणारी 5G सेवा
5G लाँच करताना भारतीय मोबाइल काँग्रेसमध्ये मुकेश अंबानी म्हणाले, ‘भारताची सुरुवात थोडी उशिरा झाली असेल, पण आम्ही जगापेक्षा उच्च दर्जाची आणि अधिक परवडणारी 5G सेवा सुरू करणार आहोत’.मुकेश अंबानी म्हणाले, ‘डिसेंबर 2023 पर्यंत आपल्या देशातील प्रत्येक शहर, प्रत्येक तालुका आणि प्रत्येक गावात 5G पोहोचवण्याच्या जिओच्या वचनबद्धतेचा मला पुनरुच्चार करायचा आहे. Jio चे बहुतांश 5G तंत्रज्ञान भारतात विकसित केले गेले आहे, त्यामुळे त्यावर आत्मनिर्भर भारत असा शिक्का आहे.
प्लॅनची किंमत किती असेल?
अंबानी म्हणाले, ‘भारतात 5G ची सुरुवात ही भारताच्या दूरसंचार इतिहासातील सामान्य घटना नाही. हे 140 कोटी भारतीयांच्या आशा आणि आकांक्षा आपल्या खांद्यावर घेऊन चालले आहे. 5G सह, भारताने सर्वांचा डिजिटल साथ आणि सर्वांच्या डिजिटल विकासाच्या दिशेने एक मजबूत पाऊल उचलेल आहे.
हे वाचलं का?
मात्र, रिचार्जसाठी तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण टेलिकॉम कंपन्या 5G प्लॅनच्या किंमतीबद्दल सतत सांगत आहेत की ते 4G प्रमाणेच असतील. हे निश्चित आहे की 5G रिचार्जसाठी 4G पेक्षा जास्त खर्च येईल, परंतु आपला खर्च जगातील इतर देशांच्या तुलनेत कमी असू शकतो.
मुकेश अंबानी म्हणतात…
लोकसंख्या आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या एकत्रित शक्तीचा वापर करून भारत जगातील आघाडीचा डिजिटल समाज बनू शकतो. वाढ आणि विकासाची दुहेरी उद्दिष्टे एकाच वेळी साध्य करता येतात. भारताला 3 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेवरून 2047 पर्यंत 40-ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेत नेले जाऊ शकते आणि दरडोई उत्पन्न 2,000 डॉलर वरून 20,000 डॉलरपर्यंत वाढवता येईल. त्यामुळे 5G हे डिजिटल कामधेनूसारखे आहे, ते आपल्याला हवे ते देऊ शकते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही, असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT