खरं आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखाल? ‘या’ टिप्स नक्की उपयोगात येतील!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोना व्हायरसने (Coronavirus) संक्रमित झालेल्या रूग्णांना उपाचारासाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची सध्या सर्वाधिक मागणी आहे. यावेळी काही जण नफा मिळविण्यासाठी तोंडाला येईल ती रक्कम सांगत आहेत. पण अशावेळी हे देखील दिसून येत आहे की, या सगळ्यात लोकांची फसवणूक देखील केली जात आहे. काही ठिकाणी बनावट रेमडेसिवीर देऊन अनेकांची लूट केली जात असल्याचं समोर आलं आहेत तर कोणालाही पैसे देऊन देखील काहीही मिळालं नसल्याचं देखील उघडकीस आलं आहे. या औषधाच्या कमतरतेमुळे सध्या सर्वत्र गोंधळ उडालेला आहे.

ADVERTISEMENT

बाजारात रेमडेसिवीरचा तुटवडा आणि त्याच्या पुरवठ्यातही कमतरता असल्याचं दिसून येत आहे. या गोष्टीचा फायदा अनेक जण याचा काळाबाजार करत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत महाराष्ट्रच नव्हे तर दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातही पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर विकणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी बनावट रेमडेसिवीबाबत एक ट्विट केले आहे. त्याने बनावट रेमडेसिवीरचा फोटो पोस्ट केला असून खरा आणि बनावट रेमडेसिवीर कसं ओळखायचं हे सांगितलं आहे. आता आम्हील तुम्हाला डीसीपींनी सांगितलेल्या 9 स्टेप्स सांगणार आहोत. जेणेकरुन आपण बनावट आणि अस्सल रेमडेसिवीर सहज ओळखू शकाल.

हे वाचलं का?

असं ओळख बनावट रेमडेसिवीर:

1. बनावट रेमडेसिवीर पॅकेटच्या शीर्षस्थानी ‘Rx’ लिहिलेले नाही. पण अस्सल इंजेक्शनच्या बॉक्सवर आपल्याला इंजेक्शनच्या नावापुढे तसं लिहिलेले दिसेल.

ADVERTISEMENT

2. बनावट रेमडेसिवीरच्या बॉक्सवर, आपल्याला औषधाच्या नावाच्या फाँट टमध्ये काहीसा बदल दिसून येईल. बनावट पॅकेटच्या तिसऱ्या ओळीत ‘100 mg/vial’ असे लिहलेले दिसून येईल. तर मूळ बॉक्सवर ‘100 mg/Vial’ असे लिहिलेले असेल. यामध्ये, आपल्याला कॅपिटल आणि स्मॉल अक्षरांचा (letters) फरक समजेल.

ADVERTISEMENT

3. ज्या जागेवर कोवीफोन (COVIFOR) लिहिलं आहे त्याच्या अलाइनमेंट मध्ये देखील गडबड पाहायला मिळते. ओरिजनल पॅकेटवर हे कोणतीही गॅप न देता लिहिण्यात आलं आहे. तर बनावट पॅकवर त्याच्यावर लिहिलेल्या मजकुरामध्ये देखील थोडे अंतर सोडलेलं पाहायला मिळेल.

‘रेमडेसिवीर इंजेक्शन काही ‘संजीवनी’ नाही, त्याने मृत्यूदरही कमी होत नाही, फक्त…’

4. COVIFOR खाली लिहिलेल्या सूचनांमध्ये देखील तुम्हाला फरक तुम्हाला दिसेल. मूळ पॅकवर याच्या खाली फक्त दोन ओळी लिहिल्या गेल्या आहेत. तर बनावट पॅकेटवर लिहिलेल्या मजकुराचा फाँट साईज अगदी छोटी असून त्यामध्ये कॅपिटल व स्मॉल लेटर्सच्या त्रुटीही दिसून येते.

5. अस्सल रेमडेसिवीर इंजेक्शन पॅकेटच्या तळाशी ‘For use in’ हे कॅपिटल लेटर्समध्ये लिहिलेले आहे. तर नकली रेमडेसिवीरच्या बॉक्सवर हे स्मॉल लेटर्समध्ये लिहलेलं आहे. ज्याद्वारे आपण त्याचे अस्सल आणि बनावट यामध्ये फरक ओळखू शकता.

6. आता बॉक्सच्या मागील बाजूस पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, अस्सल औषध असलेल्या बॉक्सच्या मागील बाजूस लाल रंगात ‘Warning’ असं लेबल असेल. तर बनावट बॉक्समध्ये आपल्याला हे पाहायलाच मिळणार नाही. जर एखाद्या नकली बॉक्समध्ये लिहलेलं दिसलंच ते तर ते काळ्या रंगात लिहिलेले असेल.

7. याच्याच अगदी खाली, ‘Covifir is manufactured under the licence from Gilead Sciences, Inc’ असं लिहलेलं आहे. जे बनावट बॉक्सवर दिसणार नाही.

8. अस्सल औषधाच्या बॉक्सवर खाली लिहिण्यात आलेल्या इंडिया (India) या शब्दातील आय हा शब्द कॅपिटल आहे. तर बनावट बॉक्समध्ये तो आपल्याला स्मॉल लेटरमध्ये असल्याचंच दिसून येईल.

Covid Emergency: महाराष्टात Oxygen, रेमडेसिवीर, बेड, प्लाझ्मा कोणतीही वैद्यकीय मदत हवी? तर हे फोन नंबर येतील कामी

9. डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी शेअर केलेल्या बनावट बॉक्सच्या या फोटोत आणखी एक चूक आढळली आहे. या बॉक्सवर Telangana (तेलंगाना) हे ‘Telagana’असं लिहिलं आहे. ही गोष्ट पाहून देखील आपण अंदाज लावू शकता की, आपल्याला देण्यात आलेलं इंजेक्शन हे खरं आहे की खोटं.

त्यामुळे जर आपल्याला कधी रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याची गरज भासलीच तर वरील सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT