बेडरूममध्ये परपुरुषासोबत होती पत्नी, अचानक पती घरी आला अन्..
न्यू यॉर्क: एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली. प्रियकराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाच त्याने आपल्या पत्नीला रंगेहाथ पकडले होते. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून संतप्त झालेल्या पतीने तब्बल तीन गोळ्या झाडून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली होती. nypost.com च्या रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती 26 वर्षीय असून त्याचं नाव टायलर लामर जेनकिन्स […]
ADVERTISEMENT

न्यू यॉर्क: एका व्यक्तीने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या घालून हत्या केली. प्रियकराशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत असतानाच त्याने आपल्या पत्नीला रंगेहाथ पकडले होते. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून संतप्त झालेल्या पतीने तब्बल तीन गोळ्या झाडून पत्नीच्या प्रियकराची हत्या केली होती.
nypost.com च्या रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती 26 वर्षीय असून त्याचं नाव टायलर लामर जेनकिन्स असे आहे. जो अमेरिकन नौसेनेत आहे. जेनकिन्सला आपल्या व्हर्जिनिया येथील घरी पत्नी दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध ठेवत असल्याचे जेव्हा आढळून आले तेव्हा संताप अनावर होऊन त्याने पत्नीच्या प्रियकराची गोळ्या झाडून हत्या केली.
पोलिसांनी एका निवेदनात असं म्हटलं आहे की, जेनकिन्सवर 28 वर्षीय टिमोथी पॉल टॅली याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सेकंड-डिग्री हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. ही घटना शुक्रवारी घडली. तीन गोळ्या लागल्याने टॅलीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जेनकिन्स याला त्याच्या घरातून अटक करण्यात आली.
The Virginian-Pilot ने मिळवलेल्या न्यायालयीन कागदपत्रांनुसार, जेनकिन्सच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की जेव्हा तिचा पती खोलीत आला तेव्हा ती टॅलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होती. हे पाहून जेनकिन्सने तिच्या प्रियकरावर थेट गोळीबार केला. जेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन जेनकिन्स अटक केली तेव्हा तो असं म्हणत होता की, ‘मी काय चुकीचं करत आहे?’










