सोलापुरात महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, पतीचा खळबजनक आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सोलापूर: सोलापूर शहर पोलीस दलातील एका महिला कॉन्स्टेबलनं विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमृता रमेश पांगरे असं या महिला कॉस्टेबलचं नाव आहे.

ADVERTISEMENT

उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर गावातील बस स्थानकावर अमृता निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे तिला तात्काल सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटल येथे नेण्यात आलं. मात्र, तिथे पोहचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. अमृता हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुगणालयात पाठवण्यात आला आहे.

आजोबा आणि वडिलांची हत्या करून तरूणाची आत्महत्या, मुंबईतली घटना

हे वाचलं का?

पती धनंजय दाढे यांचा पोलीस उपनिरीक्षकावर आरोप:

‘पत्नी अमृता हिचे एका पोलीस उपनिरीक्षकाशी संबंध होते. त्याने तिला गोड बोलून प्रेमात अडकवून ठेवलं होतं. त्याच्या आहारी अमृता गेली होती. त्याच्याशिवाय ती राहू शकत नव्हती आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा आरोपी पती धनंजय दाढे यांनी केला आहे.’ असं म्हणत दाढे यांनी याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षावर आरोप लावले आहेत. मात्र, असं असलं तरी अद्याप त्यासंबंधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

ADVERTISEMENT

जोडभावी पेठ पोलीस स्टेशनमध्ये वाचक शाखेत होती नियुक्ती

ADVERTISEMENT

अमृता रमेश पांगरे ही जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे मागील चार वर्षांपासून वाचक शाखेत कार्यरत होती. तिच्या पश्चात एक मुलगा आणि पती असा परिवार आहे. तिचे पती धनंजय दाढे हे खाजगी विमा कंपनीमध्ये नोकरीस आहे.

पूर्ण कुटुंबाला संपवून नामांकित डॉक्टरची आत्महत्या, काय घडलं असं?

शवविच्छेदनासाठी अमृता हीचा मृतदेह आणताच सोलापूर सिव्हिल रुग्णालय मध्ये त्यांच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. अमृता पांगरे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. दुसरीकडे पोलीस अधिकार्‍यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता सोलापूर पोलीस अमृताच्या पतीचा आरोप ग्राह्य धरुन उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर काही कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सध्या सोलापूर पोलिसात बरीच चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT