काळीज पिळवटून टाकणारी घटना, पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने पतीची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वसंत मोरे, बारामती

ADVERTISEMENT

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे उपलब्ध होत नसल्याच्या नैराश्यातून पतीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना बारामती तालुक्यातील कुतवळवाडी येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनोहर संभाजी कुतवळ (वय 35, रा.कुतवळवाडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुतवळ यांची पत्नी गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. पुण्यातील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर औषधोपचार सुरु होते. यामुळे रुग्णालयाने त्यांना उपचारासाठी काही पैसे भरण्यास सांगितले होते.

हे वाचलं का?

मात्र, काही केल्या पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. त्यामुळे मनोहर हे प्रचंड तणावात होते. सुरुवातीला त्यांनी जवळपास साडेचार लाख रुपये जमा करुन रुग्णालयात भरले देखील होते. मात्र, अजून रक्कम भरण्याचा निरोप आल्यानंतर त्यांना काहीही करणं शक्य झालं नाही. याच विवंचनेतून त्यांनी पहाटे एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

आई-वडिलांचं भांडण सोडवायला गेलेल्या सावत्र मुलाचा कोयत्याने वार करत खून

ADVERTISEMENT

दरम्यान, मनोहर यांचे चुलते दत्तात्रय कुतवळ हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी संपर्कात होते. संबंधित रुग्णालयामध्ये बिल कमी करण्याबाबतची प्रक्रिया सुरु असतानाच मनोहर यांनी टोकाचा निर्णय घेत आत्महत्येचे पाऊल उचलले.

ADVERTISEMENT

यानंतर सुनीलकुमार मुसळे यांनी ही परिस्थिती धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनाही या घटनेचा धक्का बसला. त्यामुळे या घटनेची माहिती मिळताच धर्मादाय आयुक्तांनी तातडीने संबंधित रुग्णालयाला महिलेच्या उपचाराचे संपूर्ण बिल माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या सगळ्या घटनेमुळे संपूर्ण बारामतीत मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आता रुग्णालयालावर काही कारवाई करण्यात येणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT