बायकोच्या ‘या’ घाणेरड्या सवयीने वैतागला नवरा, थेट सोशल मीडियावरच…
Husband-Wife: एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या घाणेरड्या सवयीमुळे इतका राग आला की, त्याने थेट सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याच्या पत्नीचा जाहीरपणे अपमान केला.
ADVERTISEMENT
Viral News: आपला जोडीदार निवडताना त्याच्यासोबत त्याच्या चांगल्या-वाईट सवयींचाही आपल्याला स्वीकार करावा लागतो. पण कधी-कधी जोडीदाराचं राहणीमान, स्वच्छता, खाण्याची पद्धत यासारख्या गोष्टी लोकांना इतक्या त्रासदायक ठरतात की त्या दोघांमधील भांडणाचं कारण बनतात. एवढंच नव्हे तर काही घाणेरड्या सवयींमुळे नातं देखील तुटल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (husband was troubled by a dirty habit of wife directly insulted on social media)
ADVERTISEMENT
पत्नीच्या घाणेरड्या सवयीला वैतागला पती
असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं आहे. बायकोच्या नाकात बोट घालण्याच्या अत्यंत घाणेरड्या सवयीने तो त्रस्त झाला होता. पत्नी नाकात बोट घातल्यावर ती तिचे हात कुठे साफ करायची हे काही दिवस त्याच्या लक्षातच आलं नाही. पण एके दिवशी ती हातावरची घाण कुठे साफ करते हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा तो देखील हैराण झाला.
सोशल मीडियावर केलं अपमानित
यामुळेचा त्या महिलेचा नवरा इतका संतापला की त्याने थेट सोशल मीडियावरच पत्नीचा अपमान करण्याचे ठरवलं. त्याने Reddit वर एका पोस्टमध्ये लिहिली आहे. ज्यामध्ये तो म्हणतो की, ‘मी अनेकदा पाहायचो की माझी पत्नी गाडी चालवताना नाकात बोट घालते पण ती कुठे हात पुसते हे माझ्या लक्षात आले नाही. पण एके दिवशी मी माझ्या गाडीच्या स्टेअरिंगकडे लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा माझं डोकंच फिरलं. कारण स्टीयरिंग व्हीलवर संपूर्ण तिच्या नाकाची घाण होती. मला खूपच किळस आली.’
हे वाचलं का?
हे ही वाचा >> नवऱ्याला वठणीवर आणण्यासाठी बायकोने सुरू केली दारू?, पतीने जोडले हात!
‘ही सवय घृणास्पद आणि त्रासदायक आहे’
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या व्यक्तीने रेडिटवर गलिच्छ स्टीयरिंग व्हीलचा फोटो देखील शेअर केला. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले – ‘आज जेव्हा मी स्वत: कार चालवत आहे, तेव्हा मला ही घाण दिसली.’ Reddit च्या ‘माइल्डली इन्फ्रिएटिंग’ फोरमवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये स्टीयरिंग व्हील अतिशय गलिच्छ दिसत आहे.
हे ही वाचा >> शिक्षिकेचा वर्गात अश्लील डान्स, Video व्हायरल झाला अन्…
यावर लोकांनी अनेक कमेंट्स केल्या. एकाने लिहिले- ‘ही सवय घृणास्पद आणि त्रासदायक आहे. आपण हिच्यासोबत कसे काय जगू शकता? एकजण रागात म्हणाला- “मी समजू शकतो की ही बाई तिचे घर कसे ठेवत असेल… किती घाणेरडी आहे ही.” पण काही लोकांनी महिलेची बाजू घेत म्हटलं की, ती तिची मर्जी आहे.. तिला जसं राहायचंय तसं राहू द्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT